शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

पाच तालुक्यांकडे पावसाची वक्रदृष्टी; राेवणी खाेळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे १२५४ मिमी पाऊस पडते. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नसतानाही धान पिकाची लागवड करीत असल्याचे दिसून येते.  यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावली. त्यामुळे शेती मशागतीची कामे अगदी वेळेवर आटाेपली.

ठळक मुद्देसरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षाही पडला कमी पाऊस; केवळ सिंचनाची साेय असलेल्याच शेतकऱ्यांनी आटाेपली कामे

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यातील गडचिराेली, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड, धानाेरा या पाच तालुक्यांमध्ये सरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. मागील आठ दिवसांपासून तर पावसाने दडीच मारली असल्याने जिल्ह्यात काेरडा दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. गडचिराेली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे १२५४ मिमी पाऊस पडते. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नसतानाही धान पिकाची लागवड करीत असल्याचे दिसून येते. यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावली. त्यामुळे शेती मशागतीची कामे अगदी वेळेवर आटाेपली. आता मात्र राेवण्यासाठी पाणी नसल्याने शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत, तर ज्या शेतकऱ्यांनी राेवणी केली त्यांचे धान करपण्याचा धाेका निर्माण झाला आहे. १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात ४४५.६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र प्रत्यक्षात केवळ ४०१.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. सिराेंचा व देसाईगंज या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षाही अधिक पाऊस पडला आहे. उर्वरित दहा तालुक्यांमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.सिचंनाची साधने असलेले शेतकरी तसेच नदी, नाल्यालगत शेती असलेले शेतकरी धान राेवणीचे काम करीत आहेत. परंतु काेरडवाहू शेतकऱ्यांना अद्यापही जाेरदार पावसाची प्रतीक्षाच आहे.  

राेवणीची कामे पडली ठप्प - आठ दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या काही भागात थोडाफार पाऊस झाला. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी तसेच ज्या शेतकऱ्यांचे शेत सखल भागात आहे अशा शेतकऱ्यांनी धान रोहिणीच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने धानाच्या बांद्यांमधील पाणी आटायला सुरुवात झाली आहे. परिणामी रोहिणीची कामे रखडली आहेत. धान लावणीच्या कामाला उशीर झाल्यास उत्पादनात घट होत असल्याचा दरवर्षीचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.- यावर्षी माेठा पाऊस अजूनही झाला नाही. एखादी तास पाऊस पडल्यानंतर लगेच ऊन निघते. त्यामुळे तापमान वाढत आहे. पाऊस व कडक ऊन यामुळे उकाड्यात वाढ आहे. दिवसा व रात्रीही उकाडा जाणवत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

जलसाठे अर्धे रिकामेचजिल्ह्यात अजूनही माेठा पाऊस झाला नाही. त्यामुळे तलावाच्या जलसाठ्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. मागील वर्षी जेवढा पाणीसाठा हाेता. त्यात थाेडी वाढ झाली आहे. तर जे जलसाठे पावसाळ्यापूर्वी काेरडे हाेते. ते आताही काेरडेच आहेत. विशेषकरून दरवर्षी उन्हाळ्यात बाेड्या काेरड्या पडतात. त्या आताही काेरड्याच आहेत. जाेपर्यंत जलसाठे भरत नाही. ताेपर्यंत उत्पादनाही हमी राहत नसल्याने शेतकरी समाधानी राहत नाही. 

 

टॅग्स :Rainपाऊस