गावातील पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग झाला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:36 IST2021-05-26T04:36:05+5:302021-05-26T04:36:05+5:30
मोहटोला ते रांगीदरम्यानच्या वैरागड-धानोरा या राज्य मार्गाचे डांबरीकरणाचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या रस्त्यावर प्रथम मोठ्या प्रमाणात ...

गावातील पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग झाला बंद
मोहटोला ते रांगीदरम्यानच्या वैरागड-धानोरा या राज्य मार्गाचे डांबरीकरणाचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या रस्त्यावर प्रथम मोठ्या प्रमाणात गिट्टी पसरवून नंतर त्यावर डांबरीकरण करण्यात येत आहे. या मार्गात दरम्यान कुकडी गावातील पावसाचे पाणी रस्ता कमी उंचीचा असल्याने रस्ता ओलांडून पाणी लगतच्या शेतात जात होते; पण आता रस्ता उंच झाल्याने पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. रस्त्याला लागून असलेल्या घरांमध्ये पावसाचे पाणी साचून घराची पडझड होऊन नुकसान होऊ शकते.
हा रस्ता उंच करण्यापूर्वी पाणी मार्गावर सीडीवर बांधकाम करणे आवश्यक आहे. संबंधित कंत्राटदाराने या बाबीकडे दुर्लक्ष केले, असा गावकऱ्यांचा आरोप
आहे.
===Photopath===
250521\img_20210522_093105.jpg
===Caption===
फोटो कु कडी उंच झालेला रस्ता