शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
2
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
3
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
6
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
7
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
14
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
15
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
16
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
17
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
18
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
19
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
20
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयात शिरले पावसाचे पाणी

By admin | Updated: January 3, 2015 01:11 IST

१ जानेवारी रोजी गुरूवारला आलेल्या अवकाळी पावसाचे पाणी जिल्हाधिकारी कार्यालयामागील बॅरेकमधील सरकारी कार्यालयांमध्ये घुसल्याने लाखो रुपयांचे साहित्य निरुपयोगी झाले असून, ...

गडचिरोली : १ जानेवारी रोजी गुरूवारला आलेल्या अवकाळी पावसाचे पाणी जिल्हाधिकारी कार्यालयामागील बॅरेकमधील सरकारी कार्यालयांमध्ये घुसल्याने लाखो रुपयांचे साहित्य निरुपयोगी झाले असून, महत्त्वाचे दस्तऐवजही खराब झाले आहेत़ सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शासनाला लाखोंचे नुकसान झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामागे दोन बॅरेक आहेत़ पहिल्या बॅरेकमध्ये कृषी विभाग, सामाजिक वनिकरण विभाग, निरंतर शिक्षण विभाग, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व अन्य कार्यालये आहेत़ जिल्हा निर्र्मिती झाल्यानंतर म्हणजे सुमारे ३० वर्षांपूर्वी हे बॅरेक तयार करण्यात आले़ तेव्हापासून या कार्यालयांच्या डागडुजीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले़ आता या बॅरेकचे सिमेंट पत्रे बदलून फायबर पत्रे लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ १ जानेवारी रोजी ढगाळ वातावरण असतानाही सिमेंट पत्रे काढण्यात आले़ मात्र, काम पूर्ण न झाल्याने अनेक कार्यालयांचे छत उघडेच होते़ संध्याकाळी अचानक पावसाने हजेरी लावली़ यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालय, निरंतर शिक्षण विभाग, सामाजिक वनिकरण विभाग व आरोेग्य विभागाच्या पाणी गुणवत्ता प्रयोेगशाळेत पावसाचे पाणी घुसले़ यामुळे ही चारही कार्यालये पावसाने जलमय झाली़ जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सुमारे लाखो रुपयांचे नवीन संगणक व अन्य साहित्य पावसामुळे निरुपयोगी पडले़ शिवाय महत्त्वाचे दस्तऐवजही ओले झाल्याने खराब झाले आहेत़ जिल्हा उपनिबंधक यांच्या कक्षाची दोन दिवसांपूर्वीच डागडुजी करण्यात आली़ परंतु त्यांच्या कक्षाचीही बरीच नासधूस झाली़ तेथील संगणकही निकामी झाला़ या बॅरेकमधील खिडक्यांची तावदाने फुटल्याने पावसाळ्यात पाणी आत शिरत असते़ शिवाय साप, विंचू यासारखे विषारी प्राणीही आत प्रवेश करीत असतात़ दोन दिवसांपूर्वीच एका मोठ्या विंचवाने प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना दर्शन दिले होेते़
अद्यापही सामाजिक वनिकरण विभागाच्या एका खोलीत छताला दोन-तीन ठिकाणी भगदाड पडलेली आहेत़ पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्यानंतर गुरूवारला रात्री छतावर ताडपत्री झाकण्यात आली़ परंतु खराब झालेले संगणक, अन्य उपकरणे आणि महत्त्वाचे दस्तऐवज यांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)