शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस पडूनही रोवणी ठप्पच

By admin | Updated: August 31, 2015 01:18 IST

मागील तीन दिवसांपासून विसोरा परिसरात दमदार पाऊस झाला आहे. मात्र धानाचे पऱ्हे करपल्याने रोवणीची कामे पूर्णपणे ठप्प पडली आहेत.

विसोरा परिसरातील शेतकरी चिंतातुर : हजारो हेक्टर जमीन पडित राहण्याची निर्माण झाली आहे शक्यताविसोरा : मागील तीन दिवसांपासून विसोरा परिसरात दमदार पाऊस झाला आहे. मात्र धानाचे पऱ्हे करपल्याने रोवणीची कामे पूर्णपणे ठप्प पडली आहेत. त्यामुळे पाऊस पडूनही शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात पाऊस अगदी सुरूवातीपासून हुलवाणी देत आहे. दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे तळे, बोडी, तलाव, बंधारे आदी जलसाठ्यांमध्ये अपेक्षित जलसाठा जमा झाला नाही. अधून मधून पाऊस पडत आहे या पावसाने काही शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली आहे. मात्र बहुतांश शेतकऱ्यांचे रोवणे अजूनही पूर्ण झाले नाही. दोन दिवस पाऊस पडल्यानंतर २० दिवस पाऊसच येत नसल्याने बांध्यांमधील पाणी आटून जात असल्याने काही दिवसात रोवणीची कामे ठप्प पडत आहेत. या प्रकारामुळे रोवणे ठप्प पडले आहेत. काही शेतकऱ्यांचे पऱ्हेसुद्धा करपले आहेत. विसोरा, शंकरपूर परिसरात मागील दोन दिवसांत चांगला पाऊस पडला त्यामुळे प्रत्येक शेतात पाणी जमा झाले आहे. मात्र पऱ्हे करपले असल्याने धानाची रोवणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांच्या पऱ्यांना फुटवे फुटले आहेत. सदर पऱ्यांची रोवणी केल्यास उत्पादनाचा खर्चही भरून निघणे अशक्य आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी पऱ्हे असूनही रोवणी करणे थांबवीले आहे. धान पिकाचा दोन महिन्यांचा कालावधी निघून गेला आहे. त्यामुळे दुबार पऱ्हे टाकणेही अशक्य झाले आहे. परिणामी शेतकरीवर्ग दुहेरी पेचात सापडला आहे. या सर्व अडचणींमुळे बांधीमध्ये पाणी साचून असले तरी रोवणीला सुरूवात झाली नाही. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली आहे. अशा पिकांसाठी मात्र सदर पाऊस अत्यंत लाभदायक असल्याने हा शेतकरी मात्र आनंदी असल्याचे दिसून येत आहे. बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी खते, बी-बियाणे, कीटकनाशके खरेदी केली. त्यावर बराच पैसा खर्च झाला आहे. हातातील पैसा अनावश्यक खर्च झाला असल्याने शेतकरी आनखी अडचणीत सापडला आहे. शासनाने तत्काळ आर्थीक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)