गडचिरोली : सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्याच्या पूर्व भागासह गडचिरोली शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यामुळे रब्बी पिकाचे नुकसान झाले. सायंकाळीही ६.३० वाजतापासून याच भागात पुन्हा रिमझीम पावसाला विजेच्या कडकडाटासह सुरूवात झाली. त्यामुळे गडचिरोली शहरातील वीज पुरवठा ठप्प झाला होता. गडचिरोलीत सुमारे अर्धा तास पावसाच्या सरी कोसळल्या. आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व धानोऱ्यातही तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कुरखेडयात वादळी पावसास सुरुवात झाली. यावेळी शहरातील बत्ती गुल झाली होती.
विजेच्या कडकडाटासह पाऊस
By admin | Updated: March 1, 2016 00:56 IST