Rain of complaints in the public court | जनता दरबारात तक्रारींचा पाऊस
जनता दरबारात तक्रारींचा पाऊस

ठळक मुद्देचामोर्शीत आढावा : आमदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सभा; शेकडोंची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : स्थानिक तहसील कार्यालयाच्या वतीने २३ जानेवारी रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय जनता दरबार आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या जनता दरबारात ११० प्रकरणांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींचे निराकरण १५ दिवसात करावे, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिले.
जनता दरबाराला आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हा प्रमुख सुरेश शहा, पं.स. सभापती भाऊराव डोर्लीकर, उपसभापती वंदना गौरकर, नगरसेवक विजय गेडाम, तहसीलदार संजय गंगथडे, प्रभारी बीडीओ नितेश माने, नायब तहसीलदार एस. के. तनगुलवार, अविनाश पिसाड, दिलीप दुधबळे, एम. एन. शेंडे, पोलीस निरिक्षक जितेंद्र बोरकर, उपविभागीय अभियंता एस. एम. उरकुडे, पी. यू. ठाकरे, चिचडोह बॅरेजचे अभियंता आर. एल. चापले, शिक्षण विस्तार अधिकारी एम. बी. कडते, विकास दुधबावरे, नितीन हेडाऊ, वाय. एस. मेश्राम, के. सी. शेडमाके, विस्तार अधिकारी एम. के. काळबांधे, कृषी पर्यवेक्षक अभिलाषी येरमे, एम. जी. गोवर्धन, जे. डी. झिलपे, साईनाथ बुरांडे, प्रतिक राणे, जयराम चलाख, विनोद गौरकर आदी उपस्थित होते.
सामान्य नागरिकांची प्रशासकीय प्रश्न सोडविण्यासाठी तहसील कार्यालयाच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. जनता दरबाराला ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. ज्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्या तक्रारी संबंधित विभागाकडे सात दिवसांच्या आत पाठवून १५ दिवसांमध्ये त्याचे निराकरण करावे, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिले.
प्रास्ताविक तहसीलदार संजय गंगथडे, संचालन रमेश अधिकारी यांनी मानले.

चौथ्या गुरूवारी भरणार जनता दरबार
नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी दर महिन्याच्या चौथ्या गुरूवारी जनता दरबार घेतले जाईल. फेब्रुवारी महिन्यात २७ फेब्रुवारी रोजी जनता दरबार आयोजित केला जाणार आहे. नागरिकांनी उपस्थित राहून तक्रारी मांडाव्या, असे आवाहन अधिकारी व आमदारांनी केले.

Web Title: Rain of complaints in the public court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.