अवकाळी पावसाचा हलक्या धानाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 06:00 IST2019-10-21T06:00:00+5:302019-10-21T06:00:29+5:30
शनिवारच्या सायंकाळपासून रविवारी पहाटेच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील आष्टी, घोट तसेच एटापल्ली तालुक्यात तसेच गडचिरोली शहर व तालुक्यात अवकाळी पाऊस बरसला. इतरही तालुक्यात बऱ्याच ठिकाणी हा अवकाळी पाऊस बरसला. एटापल्ली तालुक्यात शनिवारच्या रात्री जोरदार पाऊस बरसला.

अवकाळी पावसाचा हलक्या धानाला फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/एटापल्ली : पावसाळ्याचे दिवस संपलेले आहेत. मात्र वातावरणात अचानक बदल घडून १९ आॅक्टोबर रोजी शनिवारला तसेच रविवारला पहाटेच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस बरसला. या पावसामुळे मध्यम व जड प्रतीच्या धानपिकाला फायदा झाला. मात्र अंतिम टप्प्यात व निसव्यावर असलेल्या हलक्या प्रतिच्या धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
शनिवारच्या सायंकाळपासून रविवारी पहाटेच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील आष्टी, घोट तसेच एटापल्ली तालुक्यात तसेच गडचिरोली शहर व तालुक्यात अवकाळी पाऊस बरसला. इतरही तालुक्यात बऱ्याच ठिकाणी हा अवकाळी पाऊस बरसला. एटापल्ली तालुक्यात शनिवारच्या रात्री जोरदार पाऊस बरसला. यामुळे हलक्या प्रतीच्या धानपिकाचे नुकसान झाले. या भागात काही शेतकऱ्यांनी हलक्या प्रतीच्या धानपिकाची कापणी केली होती. कडपा बांधणीच्या प्रतीक्षेत होत्या. मात्र अचानक पाऊस बरसल्याने धानाच्या कडपा भिजून नुकसान झाले.
कोरडवाहू शेतजमिनीत कमी पाण्याची शेती करावी लागते. अशा शेतजमिनीत शेतकरी कमी मुदतीचे हलक्या प्रतीच्या धानपिकाची लागवड करतात. सदर धानपिकाची दिवाळी सणापूर्वी कापणी व बांधणी केली जाते. यावर्षी बºयाच शेतकºयांनी सुरूवातीच्या टप्प्यात हलक्या धानपिकाची रोवणी केली. त्यानंतर शेतजमिनीवर खत टाकून निंदन काढण्यात आले. काही भागातील हलक्या धानपिकावर लष्कर अळी व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला. शेतकºयांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात कीटकनाशकांची फवारणी केली. त्यामुळे हलके धानपीक पुन्हा जोमात आले. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ऐन कापणीला आलेल्या धानपिकाचे पावसामुळे नुकसान झाले.
अवकाळी पावसामुळे झालेल्या धानपीक नुकसानीबाबत प्रशासनाने सर्वेक्षण करून शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांकडून होत आहे.
१५ एकरमधील कापणी झालेले पीक भिजले
एटापल्ली तालुक्याच्या कुसनार येथील शेतकरी मन्नू सन्नू मडावी यांचे तीन एकरातील हलक्या धानपिकाची कापणी झाली होती. लच्चू दसरू हिचामी यांच्या चार एकर शेतातील, बंडू रमा टॅलैंड यांचे सात एकर तसेच जवेली, दुम्मे, पंदेवाही, कसनसूर आदी गावातील बºयाच शेतकºयांचे कापणी झालेल्या धानाच्या कडपा पावसाने भिजल्या. १५ एकरपेक्षा अधिक शेतीतील पिकांचे नुकसान झाले.