राहुल गांधी यांच्याकडून युकाॅंच्या कार्याचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:00 IST2021-08-09T05:00:00+5:302021-08-09T05:00:47+5:30

केंद्र सरकारविरोधात दिल्लीत आवाज बुलंद करण्यासाठी आयोजित युवक काँग्रेसच्या संसद घेराव आंदोलनात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसची टीम जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाली होती. यावेळी खासदार राहुल गांधी यांनी विशेषतः महाराष्ट्र राज्यातील निवडक जिल्हाध्यक्षांसाेबत चर्चा केली व त्यांचे कौतुक केले.

Rahul Gandhi praises UK's work | राहुल गांधी यांच्याकडून युकाॅंच्या कार्याचे कौतुक

राहुल गांधी यांच्याकडून युकाॅंच्या कार्याचे कौतुक

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसने आपले आदर्श जोपासत नक्षलग्रस्त, दुर्गम, आदिवासीबहुल भागात कोरोनाकाळात जे कौतुकास्पद कार्य केले आहे, ते अभिमानास्पद आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस व जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांना प्रशस्तीपत्र दिले. 
केंद्र सरकारविरोधात दिल्लीत आवाज बुलंद करण्यासाठी आयोजित युवक काँग्रेसच्या संसद घेराव आंदोलनात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसची टीम जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाली होती. यावेळी खासदार राहुल गांधी यांनी विशेषतः महाराष्ट्र राज्यातील निवडक जिल्हाध्यक्षांसाेबत चर्चा केली व त्यांचे कौतुक केले.
 गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली सतत कार्यतत्पर होते, याची संपूर्ण माहिती खासदार राहुल गांधी यांना अवगत होती, युवक काँग्रेसच्या कार्याचे राहुल गांधी यांनी काैतुक केले. यावेळी अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही., महाराष्ट्र राज्याचे  सहप्रभारी विजय सिंग, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित  तांबे, प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे उपस्थित हाेते.

रूग्णांना मिळाली सेवा
कोरोना या जागतिक महामारीच्या काळात संपूर्ण देशात काँग्रेस व युवक काँग्रेसने सेवाकार्य केले. त्यातून जनतेला मोठा दिलासा मिळाला. येथील आरोग्य यंत्रणा रुग्णालयात काम करत असताना युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते  रुग्णालयाच्या बाहेर  सेवाकार्य करीत होते. रुग्णवाहिका, रुग्णांना बेड, रुग्णांना रक्त, त्यांची अत्यावश्यक गरज पूर्ण करणे, रुग्णाच्या नातेवाइकांची भोजनव्यवस्था करणे आदी तसेच प्रसंगी आर्थिक व इतर सर्व प्रकारची मदत केली.

Web Title: Rahul Gandhi praises UK's work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.