जुन्या वादातून भांडण; रंगय्यापल्लीत माेठ्या भावाचा खून

By गेापाल लाजुरकर | Updated: October 11, 2024 21:27 IST2024-10-11T21:27:07+5:302024-10-11T21:27:27+5:30

दाेघांमध्ये काही जुन्या प्रकरणामुळे वाद हाेता.

Quarrel from an old dispute Murder of brother in Rangayipalli | जुन्या वादातून भांडण; रंगय्यापल्लीत माेठ्या भावाचा खून

जुन्या वादातून भांडण; रंगय्यापल्लीत माेठ्या भावाचा खून

गाेपाल लाजूरकर, गडचिराेली : जुन्या वादातून लहान भावाने माेठ्या भावाचा खून केल्याची घटना सिराेंचा तालुक्याच्या रंगय्यापल्ली येथे गुरूवार १० ऑक्टाेबर राेजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. चिन्नना मलय्या वडगुरी (४०) रा. रंगय्यापल्ली असे मृतकाचे नाव आहे. तर सत्यम मलय्या वडगुरी (३१) रा. रंगय्यापल्ली, ता.सिराेंचा असे आराेपीचे नाव आहे.

सत्यम वडगुरी व त्याचा माेठा भाऊ चिन्नना वडगुरी या दाेघांमध्ये काही जुन्या प्रकरणामुळे वाद हाेता. याच प्रकरणातून गुरूवारी रात्री भांडण झाले. या भांडणात आराेपी सत्यमचा राग अनावर झाला व त्याने चिन्ननाच्या मागील बाजूने उजव्या कानाखाली एका हत्याराने हल्ला केला. यामुळे चन्नना सिमेंट काॅंक्रिटच्या रस्त्यावर रक्ताच्या थाराेळ्यात पडला. अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची तक्रार रंगय्यापल्लीचे उपसरपंच बापू गट्टू अतकरी यांनी ११ ऑक्टाेबर राेजी सिराेंचा पाेलिस स्टेशनमध्ये केली. सदर तक्रारीवरून आराेपी सत्यम वडगुरी याच्यावर गुन्हा नाेंद झालेला आहे. घटनेचा अधिक तपास पीएसआय गणेश जंगले करीत आहेत.

Web Title: Quarrel from an old dispute Murder of brother in Rangayipalli