सीईओंकडून गुणवत्तेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:40+5:30
सुरू शैक्षणिक सत्राच्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जि. प. शाळांतील विद्यार्थ्यांचा एका चाचणीद्वारे स्तर निश्चित करण्यात आला होता. यात इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रारंभी भाषा व गणित याच विषयाची चाचणी घेण्यात आली हे विशेष. सदर चाचणीत स्तर निश्चित कसा करावा? याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले होते. त्यास अनुसरून स्तर निश्चित करण्यात आला होता.

सीईओंकडून गुणवत्तेचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : येथे तालुकास्तरीय शिक्षण परिषद मंगळवारी पार पडली. या परिषदेत अध्ययन समृद्धी विषयावर वर्ग घेऊन शाळानिहाय गुणवत्तेचा आढावा जि. प. सीईओ डॉ. विजय राठोड यांनी घेतला.
शिक्षण परिषदेला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, अधिव्याखाता वैशाली एगलोपवार, सहाय्यक बीडीओ स्वप्नील मगदुम, गटशिक्षणाधिकारी डॉ. पीतांबर कोडापे उपस्थित होते.
सुरू शैक्षणिक सत्राच्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जि. प. शाळांतील विद्यार्थ्यांचा एका चाचणीद्वारे स्तर निश्चित करण्यात आला होता. यात इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रारंभी भाषा व गणित याच विषयाची चाचणी घेण्यात आली हे विशेष. सदर चाचणीत स्तर निश्चित कसा करावा? याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले होते. त्यास अनुसरून स्तर निश्चित करण्यात आला होता. केलेल्या स्तर निश्चितीत तालुक्यातुन अव्वल तीन व शेवटून तीन आलेल्या शाळांचा आढावा सीईओंनी यादरम्यान घेतला. सोबतच सर्व केंद्रातील अव्वल तीन व शेवटून तीन शाळांचा गुणवत्तेबाबतचा आढावा घेतला. अव्वल असलेल्या शाळांनी हे यश कसे साध्य केले, याची कारणमीमांसा जाणून घेतली. तर मागे असणाऱ्या शाळांनी काय काय केले, हे जाणून घेतले.
प्रत्येक मूल शिकू शकते मात्र याकरिता पारंपरिक व घोकंपट्टी अध्यापन पद्धतीला तिलांजली द्यावी लागेल. तसेच कृतीयुक्त, आनंददायी अध्यापन पद्धती स्वीकारावी लागेल. प्रत्येक मूल शिकून त्याच्यातील मूलभूत क्षमता विकसित करण्याकरिता शैक्षणिक क्षेत्रात काम करणाºया प्रथम संस्थेने, भाषा व गणित विषयात कमाल नावाची एक अध्ययन अध्यापन पद्धती विकसित केली. अप्रगत असणाºया विद्यार्थ्यांसाठी ही पद्धत उपयुक्त असल्याचे बोलले जाते. या पद्धतीचा आढावा सीईओंनी घेतला. विद्यार्थ्यांमधील विविध कौशल्य विकसित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य पाटील यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील विषयक सहायक संजय बिडवाईकर, गुरूराज मेंढे, कुणाल कोवे, तपन सरकार तसेच केंद्रप्रमुख, विषय साधनव्यक्ती, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, सहायक शिक्षक असे १३५ शिक्षक हजर होते. संचालन व आभार विषय साधनव्यक्ती अरविंद घुटके यांनी केले.