पूर्वा हेमके व निषाद भाेयर ठरले अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:35 IST2021-09-13T04:35:36+5:302021-09-13T04:35:36+5:30
नंदी सजावट व वेशभूषा स्पर्धा ‘अ’ व ‘ब’ अशा दाेन गटांत घेण्यात आली. यात ४० बालमित्रांनी सहभाग घेतला. ...

पूर्वा हेमके व निषाद भाेयर ठरले अव्वल
नंदी सजावट व वेशभूषा स्पर्धा ‘अ’ व ‘ब’ अशा दाेन गटांत घेण्यात आली. यात ४० बालमित्रांनी सहभाग घेतला. नंदी सजावट ‘अ’ गट स्पर्धेत प्रथम क्रमांक पूर्वा आनंदकुमार हेमके सुभाष चौक आरमोरी, द्वितीय क्रमांक साची साईनाथ उडाण गडचिरोली तर व तृतीय क्रमांक कलश हेमंत कावडकर ब्रह्मपुरी याने पटकाविला. ‘ब’ गट वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक निषाद पीतांबर भोयर रामनगर वाॅर्ड आरमोरी, द्वितीय क्रमांक ओवी अतुल डुंबरे रामनगर वाॅर्ड आरमोरी हिने तर तृतीय क्रमांक आरुषी माणिक कुंभारे आरमोरी हिने पटकाविला. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात आले. याप्रसंगी युवारंगचे उपाध्यक्ष मनोज गेडाम, कोषाध्यक्ष प्रफुल्ल खापरे, युवारंगचे संघटक नेपचंद्र पेलणे, अजय कुथे, हितेश गिरडकर उपस्थित हाेते.
120921\img_20210912_135255.jpg
विजेत्या बालगोपाळाना बक्षीस वितरण करताना युवारंग चे पदाधिकारी......