विटेने डोक्यावर मारहाण करणाऱ्या आरोपीस शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:09 IST2021-02-18T05:09:41+5:302021-02-18T05:09:41+5:30

अली भीमानी रा. धानोरा हा आपल्या शेतात घराचे काम करीत असताना आरोपी सोनुले यांच्या तीन गाई संत्रा बगीच्यामध्ये ...

Punishment of accused who hit Vite on the head | विटेने डोक्यावर मारहाण करणाऱ्या आरोपीस शिक्षा

विटेने डोक्यावर मारहाण करणाऱ्या आरोपीस शिक्षा

अली भीमानी रा. धानोरा हा आपल्या शेतात घराचे काम करीत असताना आरोपी सोनुले यांच्या तीन गाई संत्रा बगीच्यामध्ये आल्या. त्यांना बाहेर काढत असताना आरोपीने फिर्यादीच्या डोक्यावर व हाताच्या बोटावर विटाने मारहाण केली. फिर्यादीने पोलीस स्टेशन धानोरा येथे येऊन १४ जानेवारी २०१९ रोजी फिर्याद दिली. पोलीस हवालदार भजनराव कोडाप यांनी तपास करून कोर्टात चार्जशीट दाखल केली. कोर्टात एकूण सहा साक्षीदारांचे बयान नोंदवण्यात आले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधीकारी एच. पी. पंचोली यांनी आरोपीस कलम ३२४ मध्ये तीन हजार रुपये दंड व कोर्ट सुटेपर्यंत पोलिसांच्या ताब्यात राहण्याची शिक्षा दिली. सरकारतर्फे सरकारी वकील बी. के. खोब्रागडे यांनी बाजू मांडली तर सदर प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस शिपाई रोशनलाल कहणावत यांनी काम पाहिले.

Web Title: Punishment of accused who hit Vite on the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.