पेरमिली तलावात मगरीचे पिलू आढळले
By Admin | Updated: November 11, 2016 01:19 IST2016-11-11T01:19:17+5:302016-11-11T01:19:17+5:30
अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील मोठ्या तलावात मगरीचे पिलू आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

पेरमिली तलावात मगरीचे पिलू आढळले
पेरमिली : अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील मोठ्या तलावात मगरीचे पिलू आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या तलावावर अनेक महिला कपडे धुण्यासाठी व नागरिक जनावरांना पाणी पाजण्यासाठी व धुण्यासाठी जातात. मगरीचे पिल्लू असल्याने आता नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तत्काळ तलावातील मगरीचे पिलू पकडून त्याला इतरत्र सोडून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्य रस्त्याला लागूनच मोठा तलाव आहे. या तलावाच्या पाण्यात परिसरातील शेतकरी शेतीही करतात. त्यात मगरीचे पिल्लू आढळून आले आहे. (वार्ताहर)