काेराेनाचे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST2021-04-24T04:37:38+5:302021-04-24T04:37:38+5:30
गडचिराेली : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या तसेच ग्रामीण विकासाचे कार्य करीत काेराेना आजारामुळे मृत्यू पावलेल्या गडचिराेली जिल्ह्यातील जिल्हा ...

काेराेनाचे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच द्या
गडचिराेली : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या तसेच ग्रामीण विकासाचे कार्य करीत काेराेना आजारामुळे मृत्यू पावलेल्या गडचिराेली जिल्ह्यातील जिल्हा परिषद, राज्य सरकारी सेवेतील ग्रामसेवक, आराेग्य, शिक्षक, तलाठी व इतर कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व ग्रामसेवक युनियनने केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २२ एप्रिल राेजी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून काेराेना महामारीच्या संकटाला ताेंड देत महाराष्ट्रातील अनेक गावे, खेडे, वाड्या सुरक्षित ठेवण्यासाठी गावातील विविध विकास समित्यांच्या सक्रिय पदाधिकाऱ्यांना साेबत घेऊन सरपंच, ग्रामसेवक, आराेग्य कर्मचारी, पाेलीस, तलाठी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी काेराेनाविरुद्धच्या लढाईत स्वत:ला झाेकून दिले. गृहभेटी, रुग्ण सर्वेक्षण, विलगीकरण, चेकपाेस्ट, मास्क वापर, सॅनिटायझर, फवारणी, निर्जंतुकीकरण, पररजिल्ह्यातून आलेल्या निराधार, गरजू, गरीब कुटुंबांना निवास, भाेजन व इतर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले. संपूर्ण देशात लाॅकडाऊनद्वारे बंद असताना तसेच अनेक शासकीय खासगी क्षेत्रामध्ये वर्क फ्राम हाेम सुरू असताना गावपातळीवरील या मंडळींनी जिवाची काेणतीही पर्वा न करता काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी पूर्ण सहकार्य करीत आहेत. असे काम करतानाच गडचिराेली जिल्ह्यात ग्रामसेवक, शिक्षक, पशुधन पर्यवेक्षक व इतर कर्मचारी मिळून सात जणांना काेराेनामुळे मृत्यू झाला. अशा काेराेना याेद्धांना ५० लाख रुपयांचे विमा कवच मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
निवेदनावर जि.प.कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांची स्वाक्षरी असून यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिवांना निवेदन पाठविले आहे.