जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला रुग्णालय तसेच आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथे या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, लांब अंतरामुळे कुरखेडा-कोरची येथील नागरिकांकरिता हे असुविधाजनक आहे. संचाबंदीमुळे एसटी व खासगी प्रवासी वाहतूकसूद्धा बंद आहे. सध्या कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता लांब व गर्दीच्या ठिकाणी प्रवास हा जोखमीचा ठरू शकतो. कुरखेडा, काेरची तालुक्यातील १८ वर्षे वयापेक्षा अधिक वयाेगटातील अनेक नागरिक लस घेण्यास इच्छुक आहेत. मात्र, जवळपास केंद्र नसल्याने अडचण निर्माण हाेत आहे. कुरखेडा येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन कुरखेडा येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची गरज आहे.
१८ वर्षे वयाेगटासाठी लसीकरण केंद्र कुरखेडात द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST