घरकुलाचा निधी उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST2021-05-12T04:37:46+5:302021-05-12T04:37:46+5:30
देसाईगंज नगर परिषदेद्वारे प्रस्तावित केलेल्या पंतप्रधान आवास योजनेचे पहिल्या टप्प्यातील ११६ तसेच दुसऱ्या टप्प्यातील ३९३ लाभार्थ्यांना धनादेश वितरित ...

घरकुलाचा निधी उपलब्ध करून द्या
देसाईगंज नगर परिषदेद्वारे प्रस्तावित केलेल्या पंतप्रधान आवास योजनेचे पहिल्या टप्प्यातील ११६ तसेच दुसऱ्या टप्प्यातील ३९३ लाभार्थ्यांना धनादेश वितरित केल्यामुळे या सर्व लाभार्थ्यांच्या घरकुलांचे बांधकाम स्लॅब लेव्हलपर्यंत झाले आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या लाभधारकांकरिता शासनाने निर्धारित केलेल्या सर्व अटी, शर्ती पूर्ण केल्या आहेत. डीपीआर तयार करुन महाराष्ट्र शासनाला त्याची डीयुसी प्रदान करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेनुसार केंद्र सरकारचा लाभार्थी सहकार्य वाटा एक लक्ष पन्नास हजार व राज्य शासनाचा सहकार्य वाटा एक लक्ष रुपये आहे. भाजपची सत्ता असताना २०१९ मध्ये दोन्ही टप्प्यातील लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लक्ष रुपयांचा धनादेश नगरपरिषद देसाईगंजला उपलब्ध करुन देण्यात आला. हा निधी धनादेशाच्या माध्यमातून घरकूल लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. स्लॅब लेव्हलपर्यंत काम पूर्ण झाले आहे. मात्र पुढचा निधी मिळाला नसल्याने काम ठप्प पडले आहे. उर्वरित निधी देण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे.