पेरमिली भागात फाेर-जी इंटरनेट सेवा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:22 IST2021-03-29T04:22:25+5:302021-03-29T04:22:25+5:30

पेरमिली येथे बीएसएनएलचे मोबाईल टॉवर आहे. परिसरात २० ते २५ गावांचा समावेश आहे. त्यामानाने बीएसएनएलच्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आहे. ...

Provide Fair-G internet service in Permili area | पेरमिली भागात फाेर-जी इंटरनेट सेवा द्या

पेरमिली भागात फाेर-जी इंटरनेट सेवा द्या

पेरमिली येथे बीएसएनएलचे मोबाईल टॉवर आहे. परिसरात २० ते २५ गावांचा समावेश आहे. त्यामानाने बीएसएनएलच्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ग्राहकांकडे अ‍ॅन्ड्राॅईड मोबाईल असल्याने अनेकजण मोबाईलवर अनेक ऑनलाईन कामे करतात. अनेक खासगी कंपन्यांची फोर-जी सेवा या भागात मिळत असली तरी बीएसएनएलची थ्री-जी सेवा नावापुरतीच आहे. टू-जीची स्पिडसुद्धा ग्राहकांना मिळत नसल्याने ते असमाधानी आहेत. ऑनलाईन शॉपिंग, बँकिंग तसेच अन्य कामांसाठी मोबाईल इंटरनेटची स्पिड आवश्यक प्रमाणात असणे गरजेचे आहे. मात्र, मागील १५ दिवसांपासून या भागातील इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. तसेच मंदगतीने सुरू असल्याने ऑनलाईन कामांमध्ये अडचणी येत आहेत. याबाबत संबंधित विभागाचे अधिकारीसुद्धा अनभिज्ञ असल्याचा आव करून दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पेरमिली येथील थ्री-जी इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

Web Title: Provide Fair-G internet service in Permili area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.