व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST2020-07-26T05:00:00+5:302020-07-26T05:00:52+5:30
खासदार उदयराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्याची शपथ घेतल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी असा उल्लेख केला. त्यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले. नायडू यांच्या या वक्तव्याचा गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याचा केला निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यसभेत शपथविधी सोहळ्यादरम्यान झालेल्या प्रकाराबद्दल व्यंकय्या नायडू याच्या व्यक्तव्याचा भाजपाचा शिवसेना जिल्हा गडचिरोलीतफे निषेध करण्यात आला.
खासदार उदयराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्याची शपथ घेतल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी असा उल्लेख केला. त्यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले. नायडू यांच्या या वक्तव्याचा गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय श्रुंगारपवार, जिल्हा समन्वयक सुनील पोरेड्डीवार, विधानसभा संघटक नंदू कुमरे, उपजिल्हा प्रमुख राजु कावळे, तालुका प्रमुख शेखर उईके, गजानन नैताम, गडचिरोली शहर प्रमुख रामकिरित यादव, वासुदेव शेडमाके, अश्विनी चौधरी, प्रसिद्धीप्रमुख संजय आकरे, नवनाथ उके, नरेश कुकडकर, शिवम करपे, चेतन कंदुकवार, अर्थव कापकर, दत्ता कुमरे, यश गण्यारपवार, अभिनव देशपांडे, आशिष आत्राम, शेखर पाटील, सचिन सलामे, चांगदास मसराम, नरेश कुकुडकार, क्रिष्णा मानेगुडधे, हेमंत चव्हाण, शुभम पुन्नमवार, सागर सोनटक्के, त्रिलोक शर्मा, नरेश चुटे, नंदाताई चुटे, गंगाधर चंदावार, प्रविण रामगीरवार, हेमंत भुरसे तसेच बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपच्या धोरणाचा निषेध केला.