डाॅक्टरांवरील हल्ल्याचा धानाेरात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST2021-05-14T04:35:45+5:302021-05-14T04:35:45+5:30
कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर व आराेग्य कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता अविरतपणे सेवा बजावत आहेत. अनेक राजकीय ...

डाॅक्टरांवरील हल्ल्याचा धानाेरात निषेध
कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर व आराेग्य कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता अविरतपणे सेवा बजावत आहेत. अनेक राजकीय मंडळी सुद्धा आपापल्या परीने योगदान देत आहेत. तर काही राजकीय मंडळी आपल्या पदाचा गैरवापर करून रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांवरच हल्ला करीत आहेत हे निंदनीय आहे. यामुळे डॉक्टरांचे मनोधैर्य खचत आहे. हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी. या हल्ल्याचा निषेध म्हणून हातावर काळी फिती बांधून काम केले.
यावेळी ग्रामीण रुग्णालय धानोराचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र सावसागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष खोब्रागडे, डॉ. सतीश जांभुळे, डॉ. शीतल टेंभुर्णे, डॉ. सीमा गेडाम, डॉ. सुनीता नरडंगे, डॉ. मंजुषा लेपसे, डॉ. मनोज मार्गेया, उमेश जंगवार, राजेश बत्तुलवार, संदीप धात्रक, विजू रामटेके, डेव्हिड गुरनुले, गणेश कुडमेथे, गौतम राऊत, रिया कळम, अश्विनी बांबोडे, करिष्मा कुमरे आदी उपस्थित हाेते.