विनयभंगप्रकरणी तिघांच्या निलंबनाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:00 IST2018-10-31T00:59:15+5:302018-10-31T01:00:21+5:30
येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी मुख्याध्यापक ए.एन.मेश्राम, अधीक्षक आर.एन.काळे, अधीक्षिका एन.जे.ठाकरे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रभारी प्रकल्प अधिकारी धोटे यांनी वरिष्ठांकडे पाठविल्याचे प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

विनयभंगप्रकरणी तिघांच्या निलंबनाचा प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
पेरमिली : येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी मुख्याध्यापक ए.एन.मेश्राम, अधीक्षक आर.एन.काळे, अधीक्षिका एन.जे.ठाकरे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रभारी प्रकल्प अधिकारी धोटे यांनी वरिष्ठांकडे पाठविल्याचे प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. दोषींवर कडक कारवाई करावी, यासाठी मंगळवारी पेरमिली येथे बाजारपेठ बंद ठेवून चक्काजाम आंदोलनसुद्धा करण्यात आले.
शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा पाच जणांनी विनयभंग करून मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याची घटना रविवारी घडली. पीडित मुलगी याच आश्रमशाळेतील अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत जंगलात फिरायला गेली होती. झालेल्या प्रकाराची तक्रार पेरमिली पोलीस स्टेशनमध्ये दाखल गेल्यानंतर ठाणेदार महेश मधुकर यांनी पाच आरोपींना तत्काळ अटक करून गुन्हा दाखल केला.
दरम्यान या घटनेचा पेरमिलीवासीयांनी निषेध करीत मंगळवारी बाजारपेठ बंद ठेवली. त्याचबरोबर पेरमिलीचे सरपंच प्रमोद आत्राम, जि.प.सदस्य ऋषी पोरतेट, कैलास कोरेत यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले. आश्रमशाळेसमोर सुद्धा निदर्शने केली. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी पेरमिली गाठून आंदोलनकर्त्यांची समजून काढली.
निवासी आश्रमशाळा असताना एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बाहेर जाते कशी, या कारणावरून हलगर्जीपणाचा ठपका ठेवत आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक व अधीक्षिका यांना निलंबित करावे, असे आदेश आदिवासी विकास राज्यमंत्री या नात्याने त्यांनी प्रकल्प अधिकारी यांना दिले. त्यानुसार प्रकल्प अधिकाºयांनी प्रस्ताव तयार करून सदर प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे, अशी माहिती प्रकल्प कार्यालयाने लोकमतला दिली आहे.