आरमोरी - गडचिरोली मार्गासाठी ७४६ कोटींचा प्रस्ताव; तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 15:51 IST2025-01-18T15:50:37+5:302025-01-18T15:51:06+5:30

Gadchiroli : २३४ पुलांच्या निर्मितीचे प्रस्ताव टप्प्याटप्प्याने पाठविण्यात येतील

Proposal of Rs 746 crore for Armori - Gadchiroli route; Instructions to take immediate measures | आरमोरी - गडचिरोली मार्गासाठी ७४६ कोटींचा प्रस्ताव; तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

Proposal of Rs 746 crore for Armori - Gadchiroli route; Instructions to take immediate measures

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
आरमोरी ते गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग नव्याने बांधकामासाठी ७४६ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. यासह प्रलंबित रस्ते बांधकामांना गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी १७ रोजी दिले.


महामार्ग बांधकामांमध्ये येणाऱ्या अडचणींची माहिती एकत्र करून ती सोडवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उपविभागीय अधिकारी राहुल मीना, मानसी, अमित रंजन, नमन गोयल, सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवडे, बळवंत रामटेके, आर.बी. कुकडे, महामार्गाचे कार्यकारी अभियंता ऋषीकांत राऊत, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे चंद्रशेखर सालोडकर, जि.प.चे कार्यकारी अभियंता विजय दोरखंडे आदी उपस्थित होते.


या मार्गाचाही आढावा 
राष्ट्रीय महामार्ग आलापल्ली ते गुंडेनुर, चामोर्शी-आलापल्ली-सिरोंचा, आरमोरी गडचिरोली, चातगावव धानोरा मार्ग, कोरची ते कुरखेडा तसेच दक्षिण गडचिरोली व उत्तर गडचिरोलीतील महामार्गाच्या बांधकामाची स्थिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली.


३१ मार्चची डेडलाईन 
केंद्र शासनाच्या निधीतून सुरू असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावी तसेच या आर्थिक वर्षात मंजूर प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. एप्रिलमध्ये पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे.


दर्जेदार कामांसाठी प्रस्ताव पाठवा 
चामोर्शी व एटापल्ली तालुक्यात मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असून यामुळे राज्य महामार्ग लवकर खराब होतात. भविष्यात या मार्गावर जड वाहतूक अधिक वाढणार असल्याने या मार्गाच्या गुणवत्तेत अधिक वाढ करण्यासाठी ज्या निकषांच्या अधीन राहून हे मार्ग बांधण्यात येतात, त्यात बदल करण्याचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या

Web Title: Proposal of Rs 746 crore for Armori - Gadchiroli route; Instructions to take immediate measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.