पहिली ते चाैथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकावर श्रेणीऐवजी राहणार ‘वर्गाेन्नत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:39 IST2021-05-06T04:39:01+5:302021-05-06T04:39:01+5:30
गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते चवथीचे वर्ग प्रत्यक्ष मुळीच भरले नाहीत. दरम्यान, चवथीपर्यंतच्या ...

पहिली ते चाैथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकावर श्रेणीऐवजी राहणार ‘वर्गाेन्नत’
गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते चवथीचे वर्ग प्रत्यक्ष मुळीच भरले नाहीत. दरम्यान, चवथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे सरकारचे धाेरण आहे. त्या अनुषंगाने शासनाच्यावतीने आरटीईनुसार इयत्ता पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत ८ एप्रिल २०२१ राेजी परिपत्रक काढण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकावर ‘वर्गाेन्नत’ असा उल्लेख करण्यात येणार आहे.
याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशाेधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्यावतीने परिपत्रक काढून निकाल तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना शाळांना करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये काेणत्याही कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांची आकारित व संकलीत मूल्यमापन करणे शक्य झाले नाही, अशा विद्यार्थ्यांबाबत आरटीनुसार पुढील वर्गात वर्गाेन्नत करण्यात यावे, तसा शेरा नमूद करावा, असे परिषदेने म्हटले आहे. दरवर्षी विद्यार्थी कोणत्या श्रेणीत उत्तीर्ण झाला, याची उत्सुकता राहात होती, यावर्षी मात्र तसे राहणार नाही.
बाॅक्स...
दाेन्ही पद्धतीने मूल्यमापन
शिक्षकांनी इयत्ता पहिली ते चवथीच्या वर्गांना प्रत्यक्ष वर्गात अध्यापन केलेले नसले तरी इतर साधने व तंत्रांचा अध्यापनासाठी उपयाेग झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची आकारिक मूल्यमापन करण्यात आले. तर काही शाळांमध्ये संकरित मूल्यमापन करण्यात आले आहे.
काेट...
इयत्ता पहिली ते चवथी तसेच आठवीपर्यंतच्या मूल्यमापन व निकालपत्रक तयार करण्याबाबत राज्य शासनाने ८ एप्रिल २०२१ राेजी परिपत्रक काढले आहे. काेविडच्या परिस्थितीमुळे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत पुढच्या वर्गात वर्गाेन्नत करायचे आहे. यावर्षी गुणदान करायचे नसल्याने निकाल तयार करण्यास वेळ लागणार नाही. गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांशी ऑनलाइन पद्धतीने संपर्क साधून निकाल पत्रक तयार करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. राज्य शैक्षणिक संशाेधन व प्रशिक्षण परिषदेचे परिपत्रक कार्यालयास प्राप्त झाले असून, त्या अनुषंगाने शाळा स्तरावर निकालाचे काम सुरू झाले आहे.
- हेमलता परसा, प्राथमिक शिक्षणाधिकारी, गडचिराेली
काेट...
काेराेना महामारीमुळे यावर्षीच्या सत्रात शाळा बंद हाेत्या. गुरुजी मध्येमध्ये घरी येेऊन गृहपाठ साेडविण्यास सांगत हाेते. जेव्हा मन लागत हाेते तेव्हा आपण लेखन, वाचन प्रक्रियेतून अभ्यास केला; मात्र वर्षभर शाळेत जायला न मिळाल्याने वर्गमित्रापासून दूर राहावे लागले. परीक्षा झाल्या नसल्या तरी आता पुढच्या वर्गात जाणार असल्याची माहिती शिक्षकांनी आमच्या वडिलांना दिली आहे. पुढील वर्षी शाळांचे वर्ग सुरू व्हावे, अशी अपेक्षा आहे.
- तुषार रायपुरे, विद्यार्थी.
काेट...
काेराेनामुळे मागील वर्षी परीक्षा झाल्या नाही. यावर्षीच्या दाेन्ही शैक्षणिक सत्रात वर्ग सुरू न झाल्याने घरीच राहावे लागले. शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार घरी जेवढे शक्य झाले तेवढा अभ्यास केला. शाळा बंद असल्याने काेराेनाच्या परिस्थितीत घरीच राहावे लागले. आता निकालपत्रक हाती केव्हा येणार, याची प्रतीक्षा आहे. काेराेनाचे संकट दूर झाल्यावर पुढल्या वर्षी शाळेत मी व माझे विद्यार्थी नियमित जाण्याचा प्रयत्न करू.
- अर्णव भांडेकर, विद्यार्थी.