शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी व वैरागड येथे निघाली मिरवणूक

By admin | Updated: October 9, 2014 23:02 IST

भोई, ढिवर व काहार समाजाच्यावतीने महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त ७ आॅक्टोबर रोजी आरमोरी व वैरागड येथे मिरवणूक काढण्यात आली.

आरमोरी/ वैरागड : भोई, ढिवर व काहार समाजाच्यावतीने महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त ७ आॅक्टोबर रोजी आरमोरी व वैरागड येथे मिरवणूक काढण्यात आली. आरमोरी - येथील ढिवर व भोई समाजातर्फे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी ७ वाजता घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर रात्री भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी ८ तारखेला महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली दुर्गा मंदिर-राम मंदिर- पटेल चौक, आझाद चौक- पंचायत समितीचा मुख्य मार्ग - गुजरी ते वाल्मिकी मंदिरापर्यंत नेण्यात आली. या रॅलीमध्ये भजन व वाल्मिकीचे देखावे दाखविण्यात आले. सदर रॅली यशस्वीतेसाठी देवा दुमाने, मनोहर खेळेकर, मीनाक्षी गेडाम, महादेव दुमाने, लहू दुमाने, विठ्ठल दुमाने, राजू दुमाने, सीताराम गेडाम, शरद मेश्राम, मंगेश दिघोरे, बाळू खेडकर, मंगेश खेडकर, संदीप दुमाने, भाऊराव मारबते, गोविंद मानकर, सारिका मारबते, कविता कांबळे, सायत्रा मेश्राम, नलू शेंडे, सुनीता दुमाने व भोई, ढिवर समाजातील बहुसंख्य नागरिकांनी सहकार्य केले. वैरागड- येथे ढिवर-काहार समाजाच्यावतीने महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. महर्षी वाल्मिकीच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार , माजी जि. प. सदस्य केशव गेडाम, मनोहर खेडेकर, आरमोरीचे उपसरपंच निंबेकार, भास्कर बोडणे, महादेव दुमाने, डोनूजी कांबडे, लाडे, दामोधर मेश्राम, डी. ए. हुमने, विश्वनाथ ढेंगरे, चुडाराम भानारकर, प्रा. प्रदीप बोडणे, रामदास डोंगरवार, मुरारी दुमाने आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन सावजी धनकर यांनी केले. यादरम्यान गावाच्या मुख्य रस्त्याने महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यशस्वीतेसाठी नकटू दुमाने, ऋषी कांबळे, रघुनाथ मानकर, रेखा मानकर, लता धनकर, ईश्वर दुमाने, महादेव मेश्राम, शंकर सोनबावणे यांच्यासह ढिवर-काहार समाजातील नागरिकांनी सहकार्य केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)