राज्यपालांसमोर मांडल्या विशेष मागास प्रवर्गाच्या समस्या
By Admin | Updated: March 18, 2016 01:28 IST2016-03-18T01:28:48+5:302016-03-18T01:28:48+5:30
विशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी राज्यपाल सी. विद्यासागरराव यांची भेट घेऊन ...

राज्यपालांसमोर मांडल्या विशेष मागास प्रवर्गाच्या समस्या
चर्चा : अन्याय निवारण कृती समितीने घेतली भेट
गडचिरोली : विशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी राज्यपाल सी. विद्यासागरराव यांची भेट घेऊन विशेष मागास प्रवर्गाच्या समस्यांबाबत चर्चा केली व समस्यांचे निवेदन दिले.
यावेळी राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, विशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समितीचे सरचिटणीस सुरेश पद्मशाली, सचिव सुदर्शन बोगा, बाळासाहेब नेमाडे, अशोक श्रीमल आदी उपस्थित होते. विशेष मागास प्रवर्गाच्या समस्यांबाबत पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांसोबत चर्चा केली. या प्रवर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी आजपर्यंत अनेकवेळा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष होत चालले असल्याची बाब राज्यपालांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर भिवंडी विधानसभा मतदार संघाचे आ. महेश चौबुले, भाजपाध्यक्ष संतोष शेट्टी यांचीसुद्धा भेट घेतली. (स्थानिक प्रतिनिधी)