सभेत मांडल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST2020-03-06T05:00:00+5:302020-03-06T05:00:06+5:30

भामरागड तालुक्यातील मोरडपार गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. सदर भाग अतिमागास आहे. घनदाट जंगलाचा सर्वत्र वेढा आहे. गावात सार्वजनिक विहिरी नाहीत. अथवा हातपंपसुद्धा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांना लगतच्या नदीतील पाणी प्यावे लागते. पावसाळाभर नदीतून पुराचे गढूळ पाणी वाहत असते. अशावेळी कसेबसे नागरिक गाळून पाणी पितात. पावसाळा संपताच नागरिकांना नदीतील पाणी प्यावे लागते.

Problems presented at the meeting | सभेत मांडल्या समस्या

सभेत मांडल्या समस्या

ठळक मुद्देसुविधांचा अभाव : मोरडपारवासीय पितात नदीचे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
लाहेरी : भामरागड तालुक्याच्या अतिदुर्गम भागात व लाहेरीपासून १५ किमी अंतरावर असलेले मोरडपार गाव मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. या गावातील नागरिकांना आजही नदीच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. यासह गावात अनेक समस्या आहेत. सदर समस्या नागरिकांनी सभेत मांडून त्या सोडविण्याची मागणी केली.
भामरागड तालुक्यातील मोरडपार गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. सदर भाग अतिमागास आहे. घनदाट जंगलाचा सर्वत्र वेढा आहे. गावात सार्वजनिक विहिरी नाहीत. अथवा हातपंपसुद्धा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांना लगतच्या नदीतील पाणी प्यावे लागते. पावसाळाभर नदीतून पुराचे गढूळ पाणी वाहत असते. अशावेळी कसेबसे नागरिक गाळून पाणी पितात. पावसाळा संपताच नागरिकांना नदीतील पाणी प्यावे लागते. परंतु सदर पाणी शुद्ध राहत नाही. या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते. परंतु जलस्त्रोतांचा अभाव असल्याने नागरिकांसमोर दुसरा पर्याय नाही. उन्हाळ्यात नदीचा जलस्तर खालावतो. अशावेळी नदीत खड्डा खोदून नागरिक पाणी पितात. या गावात पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, आरोग्यविषयक सुविधा आदींचा अभाव आहे. त्यामुळे नाईजालास्तव नागरिकांना दुसऱ्या गावावर अवलंबून राहावे लागत आहे.
पावसाळ्यात तर आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास दळणवळणाचे साधने उपलब्ध होत नाही. पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना पायदळ आरोग्य केंद्र गाठावे लागते. अनेकदा लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खाटेची कावड करून रूग्णांना आणावे लागते आदी समस्या गावात आहेत. परंतु सदर समस्या सोडविण्याकडे ग्राम पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पंचायत समितीसह लोकप्रतिनिही गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष करीत आहेत.

पोलिसांनी दिले आश्वासन
लाहेरी उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महारूद्र परजने, सीआरपीएफ ३७ बटालीयनचे सहायक कमांडंट संतोष भोसले यांनी मोरडपारला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली असता पोलिसांनी बोअरवेल खोदण्याकरिता प्रशासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.

Web Title: Problems presented at the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.