नाल्यांच्या उपशाला अडचण
By Admin | Updated: January 24, 2015 22:55 IST2015-01-24T22:55:04+5:302015-01-24T22:55:04+5:30
येथील अंतर्गत मुख्य रस्त्यावर गावातील काही व्यावसायिकांनी ग्राम पंचायतने बांधलेल्या नाल्यांवर सिमेंटच्या पक्क्या फरशा मांडल्या आहेत. त्यामुळे नाल्यांचा उपसा करण्यास अडचण जात आहे.

नाल्यांच्या उपशाला अडचण
वैरागड : येथील अंतर्गत मुख्य रस्त्यावर गावातील काही व्यावसायिकांनी ग्राम पंचायतने बांधलेल्या नाल्यांवर सिमेंटच्या पक्क्या फरशा मांडल्या आहेत. त्यामुळे नाल्यांचा उपसा करण्यास अडचण जात आहे. मात्र स्थानिक प्रशासन या व्यावसायिकांवर कुठलीही कारवाई करण्यास धजावत नसल्याने प्रशासनाचा सुस्तपणा उघड झाला आहे.
बसस्थानकापासून ग्रामपंचायत चौकापर्यंत रस्ता अरूंद आहे. दोन्ही बाजुंनी व्यावसायिकांनी अतिक्रमण करून पक्क्या फरशा बांधल्याने येथेच अनेक दुचाकी वाहनधारक आपली वाहने उभी करतात. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. दोन्ही बाजुंनी फरशा मांडण्यास प्रशासनाने मज्जाव केला असता तर नाल्याचा उपसा करण्यास अडचण झाली नसती, व रस्ताही रूंद रस्ता काही व्यावसायिकांनी नाल्यांवरच पक्के बांधकाम केले आहे. त्यानंतर त्यावर दुकाने थाटुन धंदा चालविता जात आहे. परिणामी रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे. येथील शाळा, महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थी याच मार्गाने याच मार्गाने ये- जा करतात. सदर मार्ग प्रमुख व एकमेव असल्याने नेहमीच येथून नागरिकांची वर्दळ असते. सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांना रस्ता पार करतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सकाळ व सायंकाळी याच मार्गाने गुरे- ढोरे गुराखी चराईसाठी नेतात. याच वेळेस विद्यार्थीही शाळेत जातात. सकाळी १० ते ११ वाजता दरम्यान रस्त्यावरून वाहतुकीची मोठी वर्दळ असते. शेतकरी व शेतमजूरही याच वेळेस कामासाठी जात असतात.
अतिक्रमण व रस्ता वाहतुकीतील अडथळांमुळे येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्यवर्ती बँकेजवळ एका व्यावसायिकाने नालीवर लांबलचक फरशा मांडून त्यावर मुरूम टाकून दुकान थाटले आहेत. त्यामुळे येथे वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होतो. त्यामुळे अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)