शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

सिरोंचा तालुक्यात बेरोजगारीची समस्या तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:50 PM

तालुक्यातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून उद्योगधंदे नसल्याने तालुक्यात बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे. एकेकाळी सुखसपन्न व श्रीमंत असलेल्या या तालुक्याची परिस्थिती आता अतिमागास तालुक्यासारखी झाली आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती तालुक्यात मोठ्या प्रमाणात असली तरी शासनाच्या वतीने येथे उद्योग निर्माण करण्यात न आल्याने बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढली आहे.

ठळक मुद्देउद्योगधंद्यांचा अभाव : बेरोजगार भत्त्याचा लाभ बंद; शासन व लोकप्रतिनिधी उदासीन

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून उद्योगधंदे नसल्याने तालुक्यात बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे. एकेकाळी सुखसपन्न व श्रीमंत असलेल्या या तालुक्याची परिस्थिती आता अतिमागास तालुक्यासारखी झाली आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती तालुक्यात मोठ्या प्रमाणात असली तरी शासनाच्या वतीने येथे उद्योग निर्माण करण्यात न आल्याने बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढली आहे.रोजगाराअभावी तालुक्यातील बेरोजगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. ‘इकडे आड व तिकडे विहीर’ अशी अवस्था बेरोजगारांची झाली आहे. हाताला जे काम मिळेल ते काम करण्यास येथील बेरोजगार इच्छुक आहे. मात्र येथे कोणतेही काम मिळत नसल्याने बेरोजगारांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाने नोकरभरती देखील पूर्णत: बंद केली आहे. सिरोंचा शहर व तालुक्यात सध्या शेत व इतर कामावरील मजुरीचे दर प्रतिदिवस २०० ते २५० रूपये आहे. मात्र एवढ्याशा मजुरीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होत आहे. उच्च शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमाचे प्रवेश, शिक्षण शुल्क भरमसाठ वाढविण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्य व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील एखादा मुलगा डॉक्टर अथवा अभियंता होणे हे दिव्य स्वप्न ठरले आहे. तालुक्याच्या कोपेला-अमडेली भागात काही वर्षांपूर्वी चुणखडीचे साठे आढळून आले होते. मात्र शासनाच्या वतीने उद्योग निर्मितीबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. शासनाच्या वतीने येथे नव्याने सर्वेक्षण केल्यास, एखादा नवीन उद्योग उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बेरोजगारीच्या या समस्येकडे विद्यमान केंद्र, राज्य सरकारसह जिल्हा व तालुक्यातील लोकप्रतिनिधी कानाडोळा करीत आहेत.