पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी याेजनेचा लाभ मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST2021-04-21T04:36:46+5:302021-04-21T04:36:46+5:30

गडचिराेली : काेराेनाच्या संकटात माेडकळीस आलेल्या शहरातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ...

The Prime Minister did not get the benefit of the street vendor self-reliance fund scheme | पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी याेजनेचा लाभ मिळेना

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी याेजनेचा लाभ मिळेना

गडचिराेली : काेराेनाच्या संकटात माेडकळीस आलेल्या शहरातील पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी याेजना सुरू केली आहे. या याेजनेंतर्गत कर्जासाठी बँकांकडे १ हजार १५१ अर्ज सादर करण्यात आले आहेत. मात्र बँकांनी केवळ ६१७ लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण केले आहे.

मागील वर्षी लाॅकडाऊनच्या कालावधीत जवळपास तीन महिने दुकाने बंद असल्याने त्यांची आर्थिक स्थिती ढासळली. केंद्र शासनाने २४ मार्च २०२० पासून पथविक्रेता आत्मनिर्भर याेजना सुरू केली. या याेजनेंतर्गत १० हजार रुपयांचे भांडवली कर्ज बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायचे आहे. या याेजनेचा लाभ घेण्यासाठी शहरी भागातील चहा, नाश्ता, हाॅटेल, चप्पल विक्रेते, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते, सायकल स्टाेअर्स, डेली निड्सचे दुकान असलेल्या १ हजार १५१ लाभार्थ्यांनी नगरपंचायत व नगर परिषदेच्यामार्फत बँकांकडे अर्ज सादर केेले. त्यापैकी ७२३ अर्ज मंजूर करण्यात आले. प्रत्यक्षात ६१७ लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण झाले आहे. निम्मे अर्ज बँकांच्या लेटलतीफ धाेरणामुळे अडून आहेत.

Web Title: The Prime Minister did not get the benefit of the street vendor self-reliance fund scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.