उन्हाळी धानाला कोंड्याचा भाव

By Admin | Updated: June 4, 2014 23:44 IST2014-06-04T23:44:02+5:302014-06-04T23:44:02+5:30

उन्हाळी धानाची फसल निघाली असून शेतकरी धान विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेत आहेत. मात्र धानाला ओलावा असून मार्केटमध्ये मंदी असल्याचे कारण पुढे करून केवळ ९00 ते ११00

The price of the bridges to summer glory | उन्हाळी धानाला कोंड्याचा भाव

उन्हाळी धानाला कोंड्याचा भाव

असंतोष : शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडून फसवणूक
अरूण राजगिरे - कोरेगाव/चोप
उन्हाळी धानाची फसल निघाली असून शेतकरी धान विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेत आहेत. मात्र धानाला ओलावा असून मार्केटमध्ये मंदी असल्याचे कारण पुढे करून केवळ ९00 ते ११00 रूपयापर्यंतचे भाव दिले जात आहे. एवढा भाव धानाच्या कोड्यालाही मिळत आहे. त्याचबरोबर या विक्रीतून धान उत्पादनाचा खर्चही भरून निघणे कठीण झाला असल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोष पसरला आहे.
कोरेगाव चोप परिसरासह देसाईगंज तालुक्यात उन्हाळी धान पिकाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. मागील वर्षी अगदी शेवटपर्यंत पाऊस पडल्याने मोठे तलाव व इटियाडोह प्रकल्प पाण्याने भरला होता. त्यामुळे यावर्षी देसाईगंज तालुक्यातील बहुसंख्य शेतकर्‍यांनी उन्हाळी धान पिकाचे उत्पादन घेतले. काही दिवसातच खरीप हंगामाला सुरूवात होणार आहे. खरीप हंगामासाठी बियाणे, खते, कीटकनाशके व इतर खर्च करण्यासाठी शेतकरी वर्ग धानाची विक्री करीत आहे. देसाईगंज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी धानाची मोठय़ा प्रमाणात आवक वाढली आहे. याचा फायदा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी घेणे सुरू केले आहे. धानामध्ये ओलावा आहे, मार्केटमध्ये मंदी आहे, असे कारण पुढे करून उन्हाळी धानाला केवळ ९00 रूपये ते १ हजार १३0 रूपयापर्यंतचे भाव दिले जात आहे. आधारभूत हमीभाव १ हजार ३00 रूपयापेक्षा जास्त असतांनाही यापेक्षाही कमी भाव देऊन शासनाचा निर्णय पायदळी तुडवून शेतकर्‍यांची लुबाडणूक चालविली जात आहे.
देसाईगंज तालुक्यातील बहुसंख्य शेतकर्‍यांनी चांगला भाव मिळावा यासाठी जय o्रीराम, ओम तीन, एचएमटी, साईराम यासारख्या बारीक धानाची लागवड केली. या धानाला इतर बाजारामध्ये जवळपास २ हजार ते ३ हजार रूपयापर्यंतचा भाव दिला जात आहे. मात्र देसाईगंज येथील व्यापार्‍यांनी संघटन करून अत्यंत कमी भाव देत आहेत. ९00 ते १ हजार १00  रूपयापेक्षा जास्त भाव तांदूळ दळल्यानंतर निर्माण झालेल्या कोंड्याला व कुकसालाही मिळत आहे. यातून व्यापारी व राईस मिलधारक लाखो रूपये कमवत आहेत.
धानाला सध्या मिळत असलेल्या भावातून नफा तर सोडाच उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. वाढत्या महागाईमुळे बियाणे, खते, कीटकनाशके यांचे भाव गगणाला भिडले आहेत. मजुरांची मजुरी १५0 ते २00 रूपये एवढी झाली आहे. या सर्व बाबीमुळे उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. मोठय़ा आशेने तालुक्यातील शेतकर्‍यांनी धान पिकाची लागवड केली. मात्र मिळत असलेल्या कमी भावामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. या विक्रीतून अत्यंत कमी पैसे मिळत असल्याने पुढील खरीप हंगाम कसा करावा, असा प्रश्न या शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. मात्र पुढील खरीप हंगामासाठी खर्च करायचा असल्याने मिळेल त्या किंमतीत धानाची विक्री केली जात आहे.
व्यापार्‍यांकडून होणारी फसवणूक लक्षात घेऊन आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी मागील एक महिन्यांपासून जिल्हाभरातील लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या या दुर्लक्षामुळेही शेतकर्‍यांचे हाल होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
धानाला बोनस देण्याचे तरतूद शासनाने केली असली तरी देसाईगंज पंचायत समितीमध्ये विकणार्‍या शेतकर्‍यांना अजूनपर्यंत रूपयाचेही बोनस देण्यात आलेले नाही. त्यामुळे बाजार समितीमध्येच धान नेऊन का विकावे, असा प्रश्न तालुक्यातील शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.
 

Web Title: The price of the bridges to summer glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.