शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित समस्या सोडविणार पत्रकार परिषद

By admin | Updated: May 17, 2014 23:38 IST

गडचिरोली-चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये मागील अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करू

अशोक नेते यांचे प्रतिपादन

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये मागील अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करू, असे प्रतिपादन नवनियुक्त खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले. देसाईगंज-गडचिरोली रेल्वेमार्गाला आपल्याच प्रयत्नाने मंजुरी मिळाली. निधी अभावी सदर रेल्वेमार्गाचे काम रखडले आहे. या मार्गासाठी निधी उपलब्ध करून देऊन सदर मार्ग पूर्ण करण्याचे भाग्यसुद्धा आपल्याला लाभणार आहे. त्याचबरोबर देसाईगंज ते मंचेरीयलपर्यंत रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न करू. जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करणे, बंगाली समाजाच्या नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवून देणे, आपल्या कालावधीत मंजूर झालेल्या पाचही बंधार्‍याचे काम पूर्ण करणे, विद्यापीठासाठी जागा उपलब्ध करून देणे, अहेरी जिल्हा, घोट, आष्टी व पेंढरी यासारख्या तालुक्यांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार. रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासाठी वनकायदा शिथील करणे, उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करून बेरोजगार युवकांच्या हाताला काम देणे, नागभिड-नागपूर रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खा. अशोक नेते यांनी दिले. यावेळी बाबुराव कोहळे, रमेश भुरसे, सुधारकर येनगंदलवार, डेडूजी राऊत, अनिल करपे, अविनाश महाजन, अविनाश कुनघाडकर, अभिलाश विसरोजवार, प्रशांत वाघरे, प्रशांत भ्रृगुवार, गजानन येनगंदलवार, वामन ठाकरे, अविनाश पाल, भारत खटी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी) पत्रकार परिषदेला उपस्थित खा. अशोक नेते, रमेश भुरसे, बाबुराव कोहळे.