ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:01 IST2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:01:02+5:30
वैरागड येथे आदिवासी माना जमात संघटनेच्या वतीने गोरजाई महोत्सव तथा यात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.कृष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे, डॉ.शिवनाथ कुंभारे, जि.प.सदस्य मनीषा दोनाडकर, शत्रृघ्न नारनवरे, चंद्रकांत चौके, अॅड.नारायण जांभुळे, पुष्पा वाघा, आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, नगरसेविका प्रगती नारनवरे, पत्रू घोडमारे, उपसरपंच श्रीराम अहिकर, भास्कर बोडणे, पं.स.चे माजी सभापती परसराम टिकले, नामदेव गरमळे, प्रा.प्रदीप बोडणे, लक्ष्मण लाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारे मार्र्कंडा, वैरागड येथील किल्ला, भंडारेश्वर, मंदिर, गोरजाई मातेचे मंदिर, अरततोंडी येथील हेमांडपंथी मंदिरासह जिल्ह्यात इतर ठिकाणी असणाऱ्या वास्तू या गडचिरोली जिल्ह्याचे वैभव आहे. या वास्तूंचे संवर्धन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले.
वैरागड येथे आदिवासी माना जमात संघटनेच्या वतीने गोरजाई महोत्सव तथा यात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.कृष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे, डॉ.शिवनाथ कुंभारे, जि.प.सदस्य मनीषा दोनाडकर, शत्रृघ्न नारनवरे, चंद्रकांत चौके, अॅड.नारायण जांभुळे, पुष्पा वाघा, आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, नगरसेविका प्रगती नारनवरे, पत्रू घोडमारे, उपसरपंच श्रीराम अहिकर, भास्कर बोडणे, पं.स.चे माजी सभापती परसराम टिकले, नामदेव गरमळे, प्रा.प्रदीप बोडणे, लक्ष्मण लाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर यात्रेदरम्यान शेकडो भाविकांनी गोरजाई मातेचे दर्शन घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वामन सावसाकडे, संचालन भारत राणे यांनी केले. यशस्वीतेसाठी माना आदिम जमात मंडळ तालुका शाखा आरमोरी , युवक संघटनेचे कार्यकर्ते तसेच पंढरी रंधये, राजीराम दडमल, हिराजी चौके, शेषराव गरमळे, नामदेव नारनवरे, व्यंकट चौधरी यांच्यासह माना समाजबांधवांनी सहकार्य केले.
किल्ला संवर्धनासाठी कटिबद्ध -आ.गजबे'
वैरागड येथील ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्वर, गोरजाई माता मंदिर आदी सर्व ऐतिहासिक वास्तू पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येतात. शासनस्तरावरून या ऐतिहासिक वास्तूंच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर करण्यात येतो. मात्र दुरूस्ती तथा संवर्धनाच्या कामात दिरंगाई होते. वैरागड येथील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी आपण कटिबद्ध आहो, असे आश्वासन आ.कृष्णा गजबे यांनी यावेळी दिले. माना समाजाचे हक्क, अधिकार व विकासासाठी आपण सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.