आष्टी, चामोर्शी बसस्थानकाच्या जागेचा प्रस्ताव सादर

By Admin | Updated: November 3, 2014 23:25 IST2014-11-03T23:25:23+5:302014-11-03T23:25:23+5:30

चामोर्शी शहरात मोठी बाजारपेठ आहे. तसेच आष्टी हे गाव चंद्रपूर-अहेरी मार्गावर आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही ठिकाणच्या नव्या बसस्थानकाचा प्रश्न जागेअभावी रखडलेला होता.

Presentation of Ashti, Chamorshi bus station premises | आष्टी, चामोर्शी बसस्थानकाच्या जागेचा प्रस्ताव सादर

आष्टी, चामोर्शी बसस्थानकाच्या जागेचा प्रस्ताव सादर

चामोर्शी : चामोर्शी शहरात मोठी बाजारपेठ आहे. तसेच आष्टी हे गाव चंद्रपूर-अहेरी मार्गावर आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही ठिकाणच्या नव्या बसस्थानकाचा प्रश्न जागेअभावी रखडलेला होता. याची दखल घेत नवनिर्वाचीत आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी कुलकर्णी यांची भेट घेऊन सदर प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याबाबत चर्चा केली.
यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी कुलकर्णी यांनी बसस्थानक बांधकामासाठी लागणाऱ्या जागेची परवानगी त्वरित घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. चामोर्शी व आष्टी येथील बसस्थानकासाठी संपादित केलेल्या जागेसंदर्भात महसूल व वनविभागाचे प्रधानसचिव यांच्याकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याची माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांना दिली. याप्रसंगी भाजपाचे गडचिरोली विधानसभा प्रमुख रविंद्र ओल्लालवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे उपस्थित होते. चामोर्शी व आष्टी या दोन्ही ठिकाणच्या नव्या बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Presentation of Ashti, Chamorshi bus station premises