पं.स. कार्यालयाच्या इमारतीला लागली गळती

By Admin | Updated: September 13, 2014 23:53 IST2014-09-13T23:53:21+5:302014-09-13T23:53:21+5:30

सर्वसामान्य नागरिकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या स्थानिक पंचायत समितीच्या कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्यामुळे पावसाळ्यात या इमारतीला गळती लागली आहे.

Pps Leakage to the office building | पं.स. कार्यालयाच्या इमारतीला लागली गळती

पं.स. कार्यालयाच्या इमारतीला लागली गळती

लोमेश बुरांडे ल्ल चामोर्शी
सर्वसामान्य नागरिकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या स्थानिक पंचायत समितीच्या कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्यामुळे पावसाळ्यात या इमारतीला गळती लागली आहे. परिणामी अनेक विभागात ओलावा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, पावसाच्या गळतीमुळे येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांचे कक्ष इतरत्र हलविण्यात आले आहे. या इमारतीच्या दूरवस्थेमुळे येथील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात त्रास सहन करावा लागत आहे.
आठवडाभरापूर्वी संततधार पाऊस बरसल्याने पंचायत समिती इमारतीचे छत गळाले. यामुळे अनेक विभागात ओलावा निर्माण झाला. जीर्ण इमारतीमुळे पावसाच्या दिवसात वऱ्हांड्यात तसेच अनेक विभागाच्या कक्षांमध्ये पाणी साचत असते. यामुळे कार्यालयीन दस्ताऐवज खराब होण्याची भिती निर्माण झाली आहे. पंचायत समिती कार्यालयाच्या मागील इमारतीत असलेल्या कृषी, बांधकाम, रोहायो, शिक्षण व लगतच्या सांख्यिकी विभागाच्या खोलांमध्ये पावसाचे पाणी गळत आहे. कक्ष अधिकारी व तसेच संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या कक्षाच्या भिंतीला भेगा गेल्यामुळे या ठिकाणीही पाणी गळत आहे. परिणामी भिंतीवर काळेभोर नकाशे निर्माण झाले आहेत. यामुळेच बीडीओंचे कार्यालयीन कक्ष इतर खोलीमध्ये हलविण्यात आले आहे. पंचायत समितीचे प्रशिक्षण भवनही पावसाळ्यात गळत असल्याने या ठिकाणीही ओलावा निर्माझा झाला आहे. पं.स. इमारतीच्या कवेलुच्या छतावर प्लास्टीक पसरविलेली आहे. या कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांसाठी शौचालय व मुत्रीघर आहे. मात्र शौचालय कुलूपबंदच आहे. मुत्रीघरात सर्वत्र घाण पसरली असून पाण्याची सुविधा नाही. पंचायत समिती कार्यालयात सर्वसामान्य महिला व महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र मुत्रीघर व शौचालयाची व्यवस्था नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या महिलांची व महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होते. ७६ ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीची एकदाही कायमस्वरूपी दुरूस्ती करण्यात आली नाही.

Web Title: Pps Leakage to the office building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.