वीज कर्मचाऱ्यांचे तिसऱ्याही दिवशी आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:38 IST2021-05-27T04:38:55+5:302021-05-27T04:38:55+5:30

कोरोना महामारीच्या काळात मेडीअसिस्ट या नवीन टी.पी.ए.ची नेमणूक कर्मचाऱ्यांना विचारात न घेता केल्यामुळे कर्मचारी व अभियंते तीव्र नाराज आहेत. ...

Power workers' agitation on the third day | वीज कर्मचाऱ्यांचे तिसऱ्याही दिवशी आंदाेलन

वीज कर्मचाऱ्यांचे तिसऱ्याही दिवशी आंदाेलन

कोरोना महामारीच्या काळात मेडीअसिस्ट या नवीन टी.पी.ए.ची नेमणूक कर्मचाऱ्यांना विचारात न घेता केल्यामुळे कर्मचारी व अभियंते तीव्र नाराज आहेत. त्यामुळे वीज कंपनीतील सहा संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे. कोरोना काळात सुमारे ४०० वर वीज कामगार, अभियंते व कंत्राटी कामगार मृत्यू पावले असून, हजारो कामगार व त्यांचे कुटुंबीय कोरोनाग्रस्त आहेत. कार्यरत कामगार व अभियंत्यांना फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन प्राधान्यांने लसीकरण करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. महाराष्ट राज्य विद्यूत मंडळ सूत्रधारी कंपनीने आधीच्या कंपनीला डावलून मेडिअसिस्ट या टी.पी.ए.ची तीन महिन्यांसाठी हस्तक्षेप करुन परस्पर नेमणूक केलेली आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत सहा संघटनांनी विविध समस्यांवर नाराजी व्यक्त केली. बैठकीत कोणताच तोडगा निघालेला नाही.त्यामुळे सहा संघटनांनी व्दारसभा घेऊन आंदोलन सुरूच ठेवण्याचे ठरविले. या सभेमध्ये एस.ई.ए. चे सहसचिव पुरूषोत्तम वंजारी, फेडरेशनचे मंडळ अध्यक्ष उदयराज पटालिया, इंटकचे विशाल केळापुरे व विद्युत क्षेत्र तांत्रिक संघटनेचे सुधीर चौधरी आदी उपस्थित हाेते.

Web Title: Power workers' agitation on the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.