अहेरी राजनगरीत विजेचा लपंडाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:36 IST2021-05-14T04:36:24+5:302021-05-14T04:36:24+5:30

अहेरी राजनगरी म्हणून पूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या या राजनगरीला विजेचे ग्रहण लागले आहे. कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या महामारीतून ...

The power outage in Aheri Rajnagari increased | अहेरी राजनगरीत विजेचा लपंडाव वाढला

अहेरी राजनगरीत विजेचा लपंडाव वाढला

अहेरी राजनगरी म्हणून पूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या या राजनगरीला विजेचे ग्रहण लागले आहे. कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या महामारीतून राजनगरीसुद्धा सुटली नाही. या महामारीत सामान्य नागरिक व रुग्णांना पुरेशी झाेप महत्त्वाची आहे, पण मागील २० दिवसांपासून अहेरीत वीजपुरवठा खंडित हाेणे नित्याचेच झाले आहे. दरदिवशी रात्री ९ वाजल्यानंतर वीजपुरवठा खंडित हाेतो. एकदा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दाेन ते चार तास वीजपुरवठा सुरळीत हाेतच नाही. तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या जवळपास पाेहाेचला आहे. त्यामुळे पंखा किंवा कुलरशिवाय झाेपणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने झाेपमाेड हाेत आहे. वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी महावितरणने प्रयत्न करावे, अशी मागणी आविसंतर्फे प्रशांत गोडसेलवार, साईनाथ औतकर, मिलिंद अलोने व इतर कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन महावितरणचे अभियंता यांना दिले आहे.

Web Title: The power outage in Aheri Rajnagari increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.