भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे शिक्षा नव्हे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 18:52 IST2021-10-13T18:52:25+5:302021-10-13T18:52:58+5:30
Gadchiroli News अनेक सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे अनेकांना शिक्षा वाटत असते. वास्तविक अशा दुर्गम भागात राहूनसुद्धा आपला वेळ सत्कारणी लावला जाऊ शकतो, असे मत ज्येष्ठ समाजसेवी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.

भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे शिक्षा नव्हे...
गडचिरोली : अनेक सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे अनेकांना शिक्षा वाटत असते. वास्तविक अशा दुर्गम भागात राहूनसुद्धा आपला वेळ सत्कारणी लावला जाऊ शकतो, असे मत ज्येष्ठ समाजसेवी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. (Posting in Bhamragad is not a punishment ... Dr Prakash Amte)
राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि स्तंभलेखक डॉ.संतोष डाखरे यांच्या ‘लक्ष्यवेध’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या सोहळ्यात डॉ.प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्याहस्ते सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कोरोना कालावधीतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा वेध घेणारे हे पुस्तक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्व अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी डॉ. आमटे यांनी व्यक्त केला.
राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ.अलका देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ.प्रमोद पवार, डॉ. कमल सैनी (राजस्थान), डॉ. विवेककुमार हिंद (बिहार), डॉ. संपदा कुल्लरवार, पुस्तकाचे लेखक डॉ. संतोष डाखरे उपस्थित होते. पुस्तकाचे समीक्षण डॉ. संदीप तुंडूरवार यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे संचालन डॉ.मंगेश आचार्य तर आभार डॉ.रवी धारपवार यांनी मानले.