कठड्याविना अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 22:17 IST2017-11-20T22:16:46+5:302017-11-20T22:17:10+5:30
चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला जोडणाºया वैनगंगा नदीवरील पुलावर पावसाळा संपून दोन महिने लोटले तरी या पुलावर लोखंडी कठडे लावण्यात आले नाहीत.

कठड्याविना अपघाताची शक्यता
आॅनलाईन लोकमत
आष्टी : चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला जोडणाºया वैनगंगा नदीवरील पुलावर पावसाळा संपून दोन महिने लोटले तरी या पुलावर लोखंडी कठडे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे दुचाकीस्वार व सायकलस्वारांना वाहन चालविताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र या बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.
गडचिरोली-आष्टी-चंद्रपूर या मार्गावर दुचाकी व चारचाकी तसेच ओव्हरलोड वाहनांची दिवसभर वर्दळ असते. शिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्याही याच मार्गावरून आवागमन करतात. रात्रीच्या सुमारास वाहनांच्या दिव्यामुळे वाहन नदीपात्रात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. हे खड्डे बुजवून पुलावर लोखंडी कठडे लावण्यात यावे, अशी मागणी होत आहे.