शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

'तो' माल गाडीतून उतरवित असतानाच पोलिसांनी गवसले ; आठ लाखांच्या मुद्देमालासह एकाला अटक

By संजय तिपाले | Updated: October 10, 2025 16:53 IST

देसाईगंजात कारवाई: आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली : शहरातील एका व्यापाऱ्याने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची गाडी बोलावली. मात्र, माल उतरवित असतानाच पोलिस धडकले अन् गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला. ही कारवाई ९ ऑक्टोबरला मध्यरात्री करण्यात आली. यावेळी एकास जागीच पकडले तर एक पळून गेला. एकूण तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून तब्बल सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ललित गोपालदास राठी (रा. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) हा देसाईगंज परिसरात आपल्या चारचाकीतून सुगंधित तंबाखूची अवैधरीत्या वाहतूक करीत असल्याच्या माहितीवरुन गुन्हे शाखेच्या पथकाने   कन्नमवार वाॅर्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. त्यावेळी संशयास्पद गाडी दिसून आली. त्यातून  राज प्रोव्हिजन्स किराणा दुकाणासमोर थांबवून काहीतरी सामान उतरवित असल्याचे आढळले. छापा टाकताच एकजण वाहनाजवळील पिशवी टाकून पसार झाला; मात्र चालक ललित राठीला पोलिसांनी पकडले. पळून गेलेल्याचे नाव दुकानमालक इंद्रकुमार नागदेवे (रा. देसाईगंज) असल्याचे ललित राठीने सांगितले. हा माल रवी मोहनलाल खटवानी ( रा. गोंदिया ) याच्या मालकीचा असून त्याने विक्री करण्यासाठी  आपल्याकडे सोपविल्याची कबुलीही त्याने दिली. 

तिघांवर गुन्हा नोंद, दोघे फरार

दोन वेगवेगळ्या कंपनीचा प्रतिबंधित ३ लाख ३ हजार १५० रुपयांचा तंबाखू व तीन लाखांचे वाहन तसेच रोख २ लाख १९ हजार ६०० रुपये असा एकूण ८ लाख २२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. देसाईगंज ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपी ललित राठी असून, इतर दोन आरोपी फरार आहेत.

यांनी केली कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि. भगतसिंग दुलत, अंमलदार राजू पंचफुलीवार व अंमलदार दीपक लोणारे यांनी कारवाई पार पाडली. तपास सहायक निरीक्षक प्रेमकुमार दांडेकर करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Police seize Gutka worth ₹8 lakh; one arrested during unloading.

Web Summary : Gadchiroli police seized ₹8.22 lakh worth of banned scented tobacco. One arrested while unloading. Two others, including the shop owner, are absconding. Case registered.
टॅग्स :Smugglingतस्करीGadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारी