शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्याचा मुद्दा गाजला

By admin | Updated: July 23, 2014 00:00 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. या सभेत आश्रमशाळांच्या पाणी पुरवठ्यासंबंधिचे बांधकाम न करताच सुमारे १ कोटी ८ लाख रूपयाची देयके

स्थायी समितीची सभा : बांधकाम न करता देयके काढलेगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. या सभेत आश्रमशाळांच्या पाणी पुरवठ्यासंबंधिचे बांधकाम न करताच सुमारे १ कोटी ८ लाख रूपयाची देयके काढण्यात आली. यासाठी जबाबदार असलेले पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांच्यावर कारवाईची मागणी जि.प. सदस्य विश्वास भोवते यांनी स्थायी समितीच्या सभेदरम्यान केली. जिल्ह्यातील आश्रमशाळांना पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी पाण्याची टाकी बांधणे, विहिरींची दुरूस्ती करणे व नळ फिटींगचे काम होते. सदर काम करण्याची जबाबदारी आदिवासी विकास विभागाने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे सोपविली होती. त्या संबंधिचा निधीसुध्दा उपलब्ध करून दिला. ही कामे अपूर्ण असतानाही जवळपास ८० टक्के रक्कमेची देयके वाटप करण्यात आली. यात कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार झाला असल्याने चौकशी करावी व यासाठी जबाबदार असलेल्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता पराते यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी जि.प. सदस्य विश्वास भोवते यांनी लावून धरली. यापूर्वीच्या स्थायी समितीच्या सभेत हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता घोडमारे यांनी चौकशी केली. त्यानुसार बांधकाम अपूर्ण असतानाही ८० टक्के रक्कमेची उचल केली असल्याचे अहवालात म्हटले आहे. भोवते यांच्या मागणीनुसार आणखी चौकशी समिती नेमूण प्रत्येक आश्रमशाळेच्या पाणी पुरवठ्याची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले.मुलचेरा तालुक्यातील सार्वजनिक विहिरींच्या दुरूस्तीसाठी प्रत्येकी ८.५ लाख रूपये व नवीन विहीर बांधकामासाठी सहा लाख रूपयाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. विहिरीच्या बांधकामापेक्षा दुरूस्तीचा खर्च जास्त असल्याने सदर अंदाजपत्रके रद्द करण्याचा ठराव १ आॅक्टोबर २०१० च्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. तरीही या विहिरींचे त्याच अंदाजपत्रकानुसार बांधकाम हाती घेण्यात आले आहे. यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाइची मागणी करण्यात आली. देसाईगंज तालुक्यातील कुरूड प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेविकेने बोगस दौरा दाखवून वेतन काढले. या संबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रकाशित केले. सदर मुद्दा जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशीची मागणी केली असता, चौकशीचे आदेश मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी दिले. (नगर प्रतिनिधी)