काेरची-बाेटेकसा मार्गाची दुर्दशा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:37 IST2021-03-17T04:37:39+5:302021-03-17T04:37:39+5:30
काेरची : काेरची-बाेटेकसा या रस्त्याचे बांधकाम सहा महिन्यांपूर्वी झाले. त्यापूर्वी दाेन वर्षे जवळपास सहा ते सात वेळा या मार्गाच्या ...

काेरची-बाेटेकसा मार्गाची दुर्दशा कायम
काेरची : काेरची-बाेटेकसा या रस्त्याचे बांधकाम सहा महिन्यांपूर्वी झाले. त्यापूर्वी दाेन वर्षे जवळपास सहा ते सात वेळा या मार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. दाेन वर्षात १५ किमी अंतराच्या रस्त्यावर बांधकाम विभागाने काेट्यवधी रुपयांचा खर्च केला. तरीही हा रस्ता पुन्हा जैसे थे झाला आहे. सदर १५ किमीच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडले असून येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. काेरची येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालये आहे. तसेच जिल्हा परिषदेचेसुद्धा बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. मात्र या दाेन्ही विभागांचे सदर रस्त्याच्या जीर्णाेद्धाराकडे दुर्लक्ष आहे. रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे या मार्गावर आजवर अनेक दुचाकींना अपघात घडले आहेत. चारचाकी वाहनातून नागरिक धाेकादायक प्रवास करीत आहेत.