निमगाव येथे वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST2021-08-17T04:41:47+5:302021-08-17T04:41:47+5:30

पाेर्ला येथे स्वातंत्र्यदिनी वृक्षाराेपण गडचिराेली : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाेर्ला येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शालेय परिसरात वृक्षाराेपण ...

Plantation at Nimgaon | निमगाव येथे वृक्षाराेपण

निमगाव येथे वृक्षाराेपण

पाेर्ला येथे स्वातंत्र्यदिनी वृक्षाराेपण

गडचिराेली : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाेर्ला येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शालेय परिसरात वृक्षाराेपण करण्यात आले. यावेळी शाळा समिती अध्यक्ष लता भाेयर, स्मृती पुडकावार, विजय बागडे, मुख्याध्यापिका लता झंझाळ, राजू राजकाेंडावार, विनाेद किरमिरे, अनिल गेडाम, कालिचरण भानारकर, शामिना शेख, देशमुख, बाेहरे आदी उपस्थित हाेते. वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी झाडे लावून ती जगवावी, असे आवाहन मुख्याध्यापिका लता झंझाळ यांनी केले.

संजीवनी उच्च प्राथमिक शाळा

गडचिराेली : संजीवनी उच्च प्राथमिक शाळा तथा संजीवनी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनी ध्वजाराेहण करण्यात आले. संस्थाध्यक्ष डी. डी. साेनटक्के यांच्या हस्ते ध्वजाराेहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थासचिव सुनील पाेरेड्डीवार, उपाध्यक्ष शकुंतला पाेरेड्डीवार, शाळा समिती सदस्य विलास निंबाेरकर, विकास पाेरेड्डीवार, मुख्याध्यापक जे. के. भैसारे, एन. के. चुटे आदी उपस्थित हाेते. पी. एस. येडलावार यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Plantation at Nimgaon