एकोपा ठेवून गावविकास साधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:57 IST2018-01-25T00:57:35+5:302018-01-25T00:57:58+5:30
भागवताच्या माध्यमातून सर्व जातीचे लोक एकत्र येतात. अशाच एकोपा गावात कायम ठेवून या एकोप्याचा वापर गाव विकासाठी करावा, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. तुळशी येथील भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.

एकोपा ठेवून गावविकास साधा
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळशी : भागवताच्या माध्यमातून सर्व जातीचे लोक एकत्र येतात. अशाच एकोपा गावात कायम ठेवून या एकोप्याचा वापर गाव विकासाठी करावा, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. तुळशी येथील भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
तुळशी येथे भागवत सप्ताहाचा समारोप मंगळवारी झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार कृष्णा गजबे, देसाईगंज पंचायत समितीचे माजी सभापती परसराम टिकले, सरपंच रेखाताई तोंडफोडे, शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष नेताजी दुनेदार, उपसरपंच मुरलीधर दुनेदार, तंमुस अध्यक्ष राजेश मारबते, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान लोणारे, सुरेश नागरे, रामकृष्ण राऊत, चित्ररेखा लोणारे, वर्षा दुनेदार, सेवा निवृत्त शिक्षक नेवारे, विष्णू दुनेदार, उमाजी कुळमेथे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भाविकांना गोपालकाला व महाप्रसादाचे वितरण करण्यात आलले. कार्यक्रमाचे संचालन दिगांबर नेवारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरूषोत्तम अवसरे, पटवारी ठाकरे, रामकृष्ण राऊत, अशोक दुनेदार, दामोधर दुफारे, गजानन वझाडे, संजय ठेंगरी, मेघनाथ दुनेदार, तुकाराम वझाडे, मोतीराम मारबते, दिवाकर मारबते, होमराज कुत्तरमारे, दिनेश बुल्ले, मुरारी दुनेदार यांनी सहकार्य केले. भागवत सप्ताहात रामधून, हरीपाठ, प्रवचन, भजन, गोवर्धन पूजा, यासह पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम घेण्यात आले. भागवत सप्ताहात दररोज भाविकांची गर्दी उसळत होती.