वर्षावासासह विविध कार्यक्रमांचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST2021-07-23T04:22:34+5:302021-07-23T04:22:34+5:30
सभेच्या अध्यक्षस्थानी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त अभियंता नरेश मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून त्रिरत्न समता संघाचे ...

वर्षावासासह विविध कार्यक्रमांचे नियोजन
सभेच्या अध्यक्षस्थानी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त अभियंता नरेश मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून त्रिरत्न समता संघाचे अध्यक्ष चंदूराव राऊत, समता बौद्ध महिला मंडळाच्या अध्यक्ष इंदू तितरे, मुख्य संघटक हंसराज लांडगे, प्रवक्ते विजय बन्सोड, महिला मंडळाच्या सचिव आशा दहिवले आदींची उपस्थिती हाेती. दी बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या जिल्हा सभेचे १६ ऑगस्टला आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात त्रिरत्न समता संघासह दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता बौद्ध महिला मंडळ व बौद्ध धम्म प्रसारक मंडळाचा सहभाग असून, सभेला महिला मंडळाच्या उपाध्यक्ष निर्मला रामटेके, कोषाध्यक्ष उषाकिरण बन्सोड, सदस्य अनिता मेश्राम, त्रिरत्न समता संघाचे राजविलास गायकवाड, जागेश्वर माने, गिरिधर मेश्राम, गौतम लांडगे, प्रा. प्रभाकर मेश्राम उपस्थित होते. सभेचे संचालन गौतम लांडगे यांनी केले, तर आभार राजविलास गायकवाड यांनी मानले.
बाॅक्स
हे आहेत वर्षावासातील कार्यक्रम
वर्षावास कार्यक्रमाचा प्रारंभ सम्राट अशोक बुद्धविहारात भन्ते यांच्या हस्ते गुरू पौर्णिमेला होईल. वर्षावासादरम्यान २५ जुलै रोजी सर्वांसाठी मोफत आरोग्यनिदान व नेत्रचिकित्सा शिबिर, आश्विन पाैर्णिमेला वर्षावासाची समाप्ती करण्यात येणार आहे. या कालावधीत कोविड नियमांचे पालन करून दररोज सायंकाळी ७ वाजता बुद्धवंदना, दर शनिवारी व पाैर्णिमेच्या दिवशी धम्मदेसना घेण्याचे निश्चित करण्यात आले. या कार्यक्रमाचा लाभ धम्म अनुयायांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
220721\22gad_1_22072021_30.jpg
विषयाची मांडणी करताना विजय बन्सोड, साेबत नरेश मेश्राम व अन्य.