उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचा प्लान करताय? मग आजच करा रेल्वे तिकीट बुकिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:06 IST2025-02-20T16:06:15+5:302025-02-20T16:06:43+5:30
उन्हाळ्यात पर्यटन : थंड हवेच्या ठिकाणांना असते पसंती

Planning to travel to a cooler place in summer? Then book your train tickets today.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : उन्हाळ्यात फिरायला जायचे तर रेल्वेचे आरक्षण फुल होऊन प्रतीक्षा यादी लागण्याची शक्यता गृहित धरता आताच आरक्षण करणे सोयीस्कर ठरू शकते. यादृष्टीने अनेकजण आतापासूनच तयारीलासुद्धा लागलेले आहेत. आपल्या संभाव्य सुट्यांचे नियोजन करून त्या कशा पद्धतीने उपभोगता येईल. यादृष्टीने प्रयत्न केले जातात. उन्हाळ्यात फिरायला जायचे तर आताच रेल्वे तिकीट बुक करून ठेवावे.
पर्यटनस्थळ असो की अन्य कोणत्याही दूरवरच्या ठिकाणी अनेकजण रेल्वेने प्रवास करण्याला पहिले प्राधान्य देतात. कारण प्रवास अधिक आरामदायी आणि सोयीस्कर असल्याने बहुतेक लोकं राखीव डब्यातून प्रवास करणे पसंत करतात. मात्र यासाठी रेल्वे तिकीट बुकिंग अगोदरच करावे लागते, जेणेकरून कन्फर्म सीट मिळू शकेल. ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे रेल्वे तिकिटे बुक करता येते. ज्यामध्ये ऑफलाइन तिकीट बुकिंग थोडे अवघड आहे कारण रेल्वे काउंटरवर जावे लागते आणि अनेक तास लांब रांगेत उभे राहावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाइन बुकिंग अनेकजण करतात.
या ठिकाणांना असते पसंती
उन्हाळ्यात महाराष्ट्रातील महाबळेश्वर, इगतपुरी, खंडाळा, लोणावळा, तोरणमाळ, माथेरान, म्हैसमाळ, अंबाजोगाई, जव्हार, पाचगणी, तसेच देशातील गुलमर्ग, सोनमर्ग, सिमला, श्रीनगर, हैदराबाद येथे पर्यटक जातात
किती दिवसांपूर्वी तिकीट बुक करता येते?
रेल्वे तिकीट आता ६० दिवस आधी बुक करता येते. यापूर्वी हा कालावधी १२० दिवसांचा होता. हा नियम १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू झाला आहे. सदर नियम रेल्वे प्रशासनाच्या सोयीचा आहे.
परीक्षा संपल्या की मजा !
उन्हाळी परीक्षा संपल्या की मुलांच्या सुटीची मजा असते. मुले बाहेरगावी भेटी देण्याचा आग्रह पालकांसमोर करतात. त्यानुसार पालक एखादे पर्यटनस्थळ शोधून तेथे आवर्जून भेट देतात.
अॅप, वेबसाइटवरही सुविधा
रेल्वे तिकीट बुकिंगबाबत माहिती आयआरसीटीसी अॅप किंवा वेबसाइटवरून प्राप्त करता येते. तसेच तिकीट बुक करता येते. प्रवाशांना सोयीस्कर व नियमित तिकिटे उपलब्ध करून देण्यासाठी आणि वेटिंग लिस्ट व्यवस्थापनासाठी बुकिंगचा कालावधी कमी करण्यात आलेला आहे.
पर्यटनस्थळांना पसंती
उन्हाळ्यात पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटक पसंती दर्शवितात. यामध्ये थंड हवेची ठिकाणेही असतात.
रेल्वेचा प्रवास का परवडतो?
वाजवी भाडे : रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी अतिरिक्त भाडे लागत नाही. वाजवी भाड्यात प्रवास करता येतो.
रेल्वेगाड्यांतील सुविधा : रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी सुविधा आहेत. या सुविधांमुळे अनेक प्रवासी रेल्वेतून प्रवास करण्याकडे आकृष्ट होतात.
वेळेचे काटेकोर नियोजन : रेल्वेगाड्या काही अपवादात्मक स्थितीतच उशिरा धावतात. नाहीतर वेळेचे काटेकोर नियोजन असते.
ऐनवेळी तिकीट नाही
उन्हाळी सुट्यांवर जाण्यासाठी रेल्वेचे ऐनवळी आरक्षण निश्चित करण्यासाठी अडचणी येतात. ऐनवेळी तिकीटसुद्धा मिळणे दुरापास्त होते. त्यामुळे अडचणी सुद्धा येतात.