रेगुंठा-बेजुरपल्ली मार्गावर पडले खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:32 IST2021-04-05T04:32:46+5:302021-04-05T04:32:46+5:30
सिरोंचा : तालुक्यातील रेगुंठा - बेजुरपल्ली मार्ग पूर्णतः उखडला आहे. जागाेजागी खड्डे पडल्याने येथून ये-जा करताना वाहनधारकांना त्रास हाेत ...

रेगुंठा-बेजुरपल्ली मार्गावर पडले खड्डे
सिरोंचा : तालुक्यातील रेगुंठा - बेजुरपल्ली मार्ग पूर्णतः उखडला आहे. जागाेजागी खड्डे पडल्याने येथून ये-जा करताना वाहनधारकांना त्रास हाेत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रेगुंठा - बेजुरपल्ली मार्ग हा सिरोंचा व अहेरी तालुका या दोन्ही तालुक्यातील नागरिक ये-जा करण्यासाठी वापर करतात. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मणक्याच्या आजारांचा त्रास जाणवत आहे. त्याशिवाय या मार्गावर बरेच किरकोळ अपघात घडत आहेत. त्यामुळे लाेकप्रतिनिधींनी लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.