रेगुंठा-बेजुरपल्ली मार्गावर ठिकठिकाणी पडले खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:08 IST2021-02-18T05:08:02+5:302021-02-18T05:08:02+5:30
रेगुंठा-बेजुरपल्ली मार्ग हा सिरोंचा व अहेरी तालुका या दोन्ही तालुक्यातील नागरिक ये-जा करण्यासाठी वापर करतात. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर ...

रेगुंठा-बेजुरपल्ली मार्गावर ठिकठिकाणी पडले खड्डे
रेगुंठा-बेजुरपल्ली मार्ग हा सिरोंचा व अहेरी तालुका या दोन्ही तालुक्यातील नागरिक ये-जा करण्यासाठी वापर करतात. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मणक्याच्या आजारांचा त्रास जाणवत आहे. त्याशिवाय या मार्गावर बरेच किरकोळ अपघात घडत आहेत. त्यामुळे लाेकप्रतिनिधींनी लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स ....
वेलगुरात पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या दामरंचा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वेलगूर येथे अद्यापही अंतर्गत पक्के रस्ते बांधण्यात आले नाही. वेलगूर येथील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जात आहे. याबाबत ग्रामपंचायतीला अनेकदा नागरिकांनी कळविले.
ग्रामपंचायतीला प्राप्त निधीतून या भागात विकासकामे करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात आली. मात्र गावाच्या विकासासाठी प्राप्त होणाऱ्या निधीचा खर्च कोणत्या कामांवर केला जातो, अशी शंका गावातील अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या साेयीसाठी अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी हाेत आहे. विशेष म्हणजे, वेलगूर परिसरातील अनेक गावात अद्यापही अंतर्गत रस्त्याचे पक्के बांधकाम करण्यात आले नाही. पावसाळ्यात नागरिकांना चिखल तुडवत वाट काढावी लागते, अशी बिकट स्थिती आहे.