शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पुलाजवळचा खड्डा धोकादायक

By admin | Updated: August 29, 2016 02:13 IST

चामोर्शी तालुक्यातील विसापूर रै. गावानजीकच्या नदीपुलाजवळ एक महिन्यापूर्वी पुरामुळे मोठा खड्डा पडला.

अपघाताची शक्यता : विसापूर रै. नदीजवळ पुरामुळे रस्ता उखडलाआमगाव (म.) : चामोर्शी तालुक्यातील विसापूर रै. गावानजीकच्या नदीपुलाजवळ एक महिन्यापूर्वी पुरामुळे मोठा खड्डा पडला. परंतु सदर खड्डा बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या खड्ड्याची दुरूस्ती करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याकडे लोकप्रतिनिधीही कानाडोळा करीत असल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मागील महिन्यात सुरूवातीला मेघ गर्जनेसह सतत चार दिवस पाऊस झाला. त्यामुळे विसापूर नजीकच्या नदीपुलावरून तीन दिवस पुराचे पाणी वाहत होते. या पाण्यामुळे पुलालगतच्या रस्त्यावर एका बाजुने मोठा खड्डा पडला. शिवाय पुलाच्या लगत रस्त्यावरील डांबरही वाहून गेले. त्यामुळे येथे खड्डा पडून गिट्टीही उखडली. दुचाकी, चारचाकी वाहनांना येथून आवागमन करणे अडचणीचे झाले. पुलालगत रस्त्याची कडा अरूंद आहे. काही भाग खचलेलाही आहे. या मार्गाने दुचाकी, चारचाकीसह अवजड वाहने आवागमन करीत असतात. त्यामुळे येथून नेहमीच वर्दळ असते. अशा स्थितीत रस्ता योग्य असणे गरजेचे आहे. परंतु सदर पुलाजवळ मोठा खड्डा पडल्याने तो पुन्हा विस्तारण्याची शक्यता आहे. घोट, आमगाव महाल, विसापूर रै., खोर्दा, तळोधी भागातील नागरिक याच मार्गाने ये- जा करीत असतात. रात्रीच्या सुमारासही येथून वाहतूक असते. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन खड्डा तत्काळ बुजवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. एक महिन्यापूर्वी सदर खड्डा पडला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्यापही जाग आलेली नाही. लोकप्रतिनिधीही उदासीन असल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाने नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन खड्डा तत्काळ बुजवावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)