शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच शेणखताचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 05:00 IST2020-09-26T05:00:00+5:302020-09-26T05:00:34+5:30
गावाच्या दर्शनी भागात शाळेची इमारत असल्याने शाळेच्या बाजूला गावात प्रवेश करण्यासाठी रस्ता आहे. या मुख्य रस्त्यावर स्थानिक प्रशासनाने प्रवेशद्वार उभारले. परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला पक्क्या नाल्यांचा अभाव असल्याने रस्त्यावर चिखल पसरतो. मुख्य रस्त्याला व कढोली-कुरखेडा मार्गालगत शाळेची संरक्षक भिंत आहे. रस्ता व संरक्षक भिंतीच्या मधोमध असलेल्या मोेकळ्या जागेत काही लोकांचे शेणखताचे ढीग आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी येत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच शेणखताचे ढीग
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : कुरखेडा तालुक्याच्या कढोली येथील श्री तुकाराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारासमोरच शेणखताचे ढीग आहे. तसेच शाळेच्या मागच्या बाजूला गुरांचा कळप जमा होण्यासाठी आखर आहे. त्यामुळे शाळा परिसरात नेहमी दुर्गंध येते. या दुर्गंधीने शाळेतील शिक्षकांसह कर्मचारी त्रस्त झाले आहेत. येथील शेणखताचे ढिगारे हटवावे, अशी तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
वैरागड-कुरखेडा मार्गावर कढोली हे गाव आहे. रस्त्यालगत श्री तुकाराम विद्यालय आहे. गावाच्या दर्शनी भागात शाळेची इमारत असल्याने शाळेच्या बाजूला गावात प्रवेश करण्यासाठी रस्ता आहे. या मुख्य रस्त्यावर स्थानिक प्रशासनाने प्रवेशद्वार उभारले. परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला पक्क्या नाल्यांचा अभाव असल्याने रस्त्यावर चिखल पसरतो. मुख्य रस्त्याला व कढोली-कुरखेडा मार्गालगत शाळेची संरक्षक भिंत आहे. रस्ता व संरक्षक भिंतीच्या मधोमध असलेल्या मोेकळ्या जागेत काही लोकांचे शेणखताचे ढीग आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी येत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तक्रारींकडे कानाडोळा
कढोली येथील श्री तुकाराम विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले शेणखताचे ढीग हटविण्याबाबत शाळेने ग्राम पंचायतीकडे अनेकदा तक्रार केली. परंतु कारवाई झाली नाही. याशिवाय शाळेच्या मागील बाजूस सकाळी ११ वाजेपर्यंत आखरावर गुरांचा कळप असतो. त्यामुळे परिसरातील दुर्गंधी शाळेपर्यंत येत असते. शिक्षक व कर्मचाºयांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शाळेने आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे.