गडचिराेली : शहरात डुकरांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे. या डुकरांचा नगरपालिकेच्या वतीने बंदाेबस्त केला जाणार आहे. जून महिन्यापासून डुकरे पकडण्याची माेहीम हाती घेतली जाणार आहे.
गडचिराेली शहरालगत असलेल्या कैकाली समाज वस्तीतील काही नागरिक डुक्करपालनाचा व्यवसाय करतात. मात्र एका ठिकाणी डुकरे बंदिस्त ठेवली जात नाही. ही डुकरे गडचिराेली शहरात रात्रंदिवस विविध भागात फिरत राहतात. संपूर्ण शहरात डुकरांचा त्रास मागील काही दिवसांपासून वाढला आहे. रस्त्यावर फिरत असल्याने अपघात हाेण्याची शक्यता आहे. डुकरांचा बंदाेबस्त करण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून नगरपालिकेकडे अनेकवेळा करण्यात आली. याची दखल घेऊन नगराध्यक्ष याेगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, नियाेजन सभापती प्रशांत खाेब्रागडे, सदस्य लता लाटकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आराेग्य विभागाच्या बैठकीत डुकरांचा बंदाेबस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. डुक्कर पकडण्याची माेहीम वाशिमच्या पथकामार्फत जून महिन्यात राबविली जाणार आहे.
काेराेना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी शहरातील नाल्यांमध्ये जंतुनाशक पावडरची फवारणी, साेडियम हायपाेक्लाेराईडची फवारणी केली जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी यांनी दिली आहे.