शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

अपंग व्यक्तींनी शिबिराचा लाभ घ्यावा

By admin | Updated: September 4, 2016 01:50 IST

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नातून कानपूर येथील एलीमको कंपनीने

गुरूवारी महास्वावलंबन शिबिर : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनगडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नातून कानपूर येथील एलीमको कंपनीने अल्पउत्पन्न गटातील अपंग व्यक्तींना आवश्यक साहित्य मोफत पुरविण्यासाठी मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागात १५ सप्टेंबर रोजी गुरूवारला महास्वावलंबन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त अपंग व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी केले आहे.अपंगांचे शिबिर आयोजित करण्याबाबतच्या नियोजनासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, जिल्हा सामान्य रूग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विलास मोहतुरे, समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एन. जे. आत्राम आदी उपस्थित होते. १५ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या अपंगांच्या महास्वावलंबन शिबिरात ४० टक्के अपंगत्व असलेल्या अपंगांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आलले आहे. कानपूर येथील एलीमको कंपनीचे पथकाद्वारे अपंगाच्या हातापायाची तपासणी करून अहवालानुसार दोन महिन्यांनी व्हिलचेअर सायकल आदी साहित्य विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या साहित्याचा लाभ घेण्यासाठी शिबिरात येताना अपंगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबूक, निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणताही एक पुरावा सोबत ठेवणे आवश्यक आहेत. याशिवाय दोन पासपोर्ट अपंग व्यक्तींनी सोबत आणावे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी बैठकीत दिली. (स्थानिक प्रतिनिधी)